शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

Anil Deshmukh Arrested: कोणीही घरी जायचे नाही; अनिल देशमुखांच्या चौकशीवेळी ईडीने दिलेले कर्मचाऱ्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 07:57 IST

Anil Deshmukh Arrest story: सहआयुक्त दाखल झाल्यानंतर चौकशीला वेग : नकारात्मक प्रतिसादानंतर अटकेचा निर्णय

जमीर काझीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सक्तवसुली संचालनालयाने  (ईडी) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केल्याने ऐन दिवाळीत राज्यातील राजकारणात मोठा  बॉम्ब फुटला. त्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल १३ तास त्यांची चौकशी केली असली तरी त्यातील अखेरचे चार तास निर्णायक ठरल्याचे सांगण्यात येते. रात्री साडेआठच्या सुमारास सहआयुक्त सत्यव्रत कुमार दिल्लीतून मुंबईच्या कार्यालयात दाखल झाल्यानंतर त्यांनी चौकशीची सूत्रे स्वतःच्या ताब्यात घेतली. देशमुख यांच्याकडून त्यांना नकारात्मक प्रतिसाद मिळू लागल्याने चौकशी उशिरापर्यंत चालू ठेवत अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कथित १०० कोटींच्या  वसुली प्रकरणात सीबीआयने देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर  ईडीने त्याच्या आधारावर मनी लॉन्ड्रिंगच्या १९ पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल केला. शुक्रवारी उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर चार महिन्यांपासून बेपत्ता असलेले देशमुख सोमवारी सकाळी ईडीच्या कार्यालयात वकिलासमवेत हजर झाले. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याबाबत तातडीने दिल्लीतील मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांची कल्पना दिली. 

मुंबई विभागाचे सहआयुक्त सत्यव्रत कुमार हे पणजी व रायपूर विभागाचा अतिरिक्त पदभार असल्याने त्यासंबंधीच्या कामासंबंधी दिल्लीत होते. त्यामुळे मुंबई युनिट-२चे अप्पर आयुक्त योगेश वर्मा  यांना देशमुख यांच्या चौकशीची कार्यवाही सुरू करण्याच्या तर सत्यव्रत कुमार यांना तातडीने मुंबईत जाण्याची सूचना मुख्यालयातील विशेष संचालक अनुपकुमार दुबे यांनी दिल्या. त्यानुसार कुमार हे विशेष विमानाने मुंबईला आले. रात्री साडेआठच्या सुमारास कार्यालयात पोहचल्यानंतर त्यांनी गेल्या ९ तासांपासून झालेल्या कार्यवाहीची अधिकाऱ्याकडून माहिती घेतली. त्यानंतर स्वतः चौकशीला प्रारंभ केला. अटक केलेल्या  पी. ए. कुंदन शिंदे, संजीव पलांडे यांच्याकडून मिळालेली माहिती, सचिन वाझे व अन्य साक्षीदाराच्या जबाबाच्या अनुषंगाने त्यांच्याकडे माहिती विचारली.

देशमुख  हे बहुतांश प्रश्नांवर उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यामुळे त्यांनी सर्व सहकाऱ्यांना  उशिरापर्यंत कार्यालयात थांबण्याची सूचना केली. कंटाळलेल्या देशमुख यांना साडेबाराच्या सुमारास संशयित म्हणून अटक करण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्याचे वकील  इंद्रपाल सिंह कार्यालयात आले. देशमुख यांच्याशी त्यांनी चर्चा केली. सुमारे तीनच्या सुमारास ते कार्यालयातून बाहेर पडले. देशमुख यांच्यावर सेक्शन १९ पीएमएलए अंतर्गत कारवाई करण्यात आली असून ती चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले.

देशमुख यांना मिळणार घरचे जेवण‘ईडी’च्या ताब्यात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची दिवाळी ईडीच्या कोठडीत जाणार असली तरी, त्यांना तेथे घरचे जेवण, औषधे मिळणार आहेत. तसेच चौकशीवेळी त्यांच्या वकिलालाही त्यांच्यासमवेत उपस्थित राहता येणार आहे. देशमुख यांचे  वय व आजारपण लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांना ही मुभा दिली असल्याचे त्यांच्या वकिलाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय