शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत एएनआयची छापेमारी, पडघा बोरिवलीतून १५ जणांना घेतले ताब्यात

By नितीन पंडित | Updated: December 9, 2023 16:17 IST

एएनआयने ताब्यात घेतलेला पडघा बोरिवली येथील आरोपी साकीब नाचन हा यापूर्वी मुंबई बॉम्बस्फोट व इतर अतिरेकी कारवायांप्रकरणातील आरोपी असून तो अनेक वर्षे अटक होता.

भिवंडी: आयसिस संघटनेत सक्रिय असलेल्या संशयितांना राज्य व देशात विविध ठिकाणांहुन ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने भिवंडीत ठिकठिकाणी छापेमारी करून मुंबई नाशिक महामार्गावरील ग्रामीण भागातील पडघा बोरिवली येथून १५ जणांना ताब्यात घेतले आहे.        साकिब नाचन,हासिब मुल्ला,मुसाब मुल्ला,रेहान सुसे,फरहान सूसे,फिरोझ कुवार,आदिल खोत,मुखलिस नाचन,सैफ आतिक नाचन,याह्या खोत,राफिल नाचन,राझील नाचन,शकूब दिवकर,कासीफ बेलारे,मुंझिर केपि अशा १५ जणांना एनआयएने पडघा बोरिवलीतून अटक केली असून या सर्वांना दिल्ली येथे घेऊन जाणार असून एएनआय प्रकरणातील न्यायालयात या सर्वांना हजर करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.        एएनआयने ताब्यात घेतलेला पडघा बोरिवली येथील आरोपी साकीब नाचन हा यापूर्वी मुंबई बॉम्बस्फोट व इतर अतिरेकी कारवायांप्रकरणातील आरोपी असून तो अनेक वर्षे अटक होता. त्याची आयसीस या अंतकवादी संघटनेशी संपर्क असल्याचा संशय एएनआयने व्यक्त करीत त्यास अटक केली आहे. पडघा बोरिवली बरोबरच भिवंडी शहरातील तीनबत्ती,इस्लामपुरा,शांतीनगर,निजामपुरा अशा चार ठिकाणी एएनआयने येथील काही व्यक्तींची चौकशी केली आहे. एएनआयने भिवंडी शहरासह ग्रामीण भागात केलेल्या या कारवाईमुळे शहर व ग्रामीण भागात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 यापूर्वी एएनआयने पुणे आयसिस मॉड्युल प्रकरणात ऑगस्ट महिन्यात अटक केलेला सहावा आरोपी शामील नाचन हा शनिवारी अटक केलेला आरोपी साकीब नाचन याचा मुलगा आहे.त्यांनतर आता एएनआयने साकीब नाचनसह पंधरा जणांना अटक केली आहे.या पूर्वी पडघा बोरीवली येथून ३ जुलै रोजी झुल्फिकार बडोदावाला,शार्जिल शेख त्या पाठोपाठ ५ ऑगस्ट रोजी अकीब नाचण यास अटक केली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhiwandiभिवंडी