शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मोमोज न मिळाल्यानं तरुण भडकला; लहान मुलावर फेकलं उकळतं तेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 16:25 IST

आसपास गर्दी असूनही एकानंही आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला नाही; लहान मुलाची प्रकृती स्थिर

नवी दिल्ली: दिल्लीतल्या हैदरपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणानं मोमोजच्या दुकानात बसलेल्या लहान मुलावर उकळतं तेल फेकलं. तरुणाला मोमोज न मिळाल्यानं त्यानं हे कृत्य केलं. लहान मुलावर गरम तेल फेकून तरुण तिथून फरार झाला. यावेळी आसपास गर्दी होती. मात्र कोणीही आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला नाही. उकळतं तेल अंगावर फेकण्यात आलेल्या मुलाची प्रकृती आता स्थिर आहे. त्याच्या जीवाला निर्माण झालेला धोका आता टळला आहे.बापरे! नदीवर म्हशी धूवून परतताना; अचानक मागून आली मगर, काही कळायच्या आतचं घडलं असं....या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. सध्या आरोपीचा शोध सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतली जात आहे. शालीमार बाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला. हैदरपूरमध्ये असलेल्या मोमोज दुकानाचा चालक कामानिमित्त दुकानाच्या बाहेर गेला होता. त्यावेळी त्याचा १२ वर्षांचा पुतण्या दुकानात होता. तिथे आलेल्या एका तरुणानं मोमोज मागितले. त्यावर मी केवळ दुकानावर लक्ष ठेवत आहे. काका आल्यावरच मोमोज मिळतील, असं मुलानं तरुणाला सांगितलं.खळबळजनक! 'गे' पार्टनरचं लग्न ठरलं; 'या' भीतीने मग जोडीदारालाच संपवलं; पुण्यातील घटनामुलानं दिलेलं उत्तर ऐकून तरुण संतापला. त्यानं मुलासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. बाजूला कढईत गरम तेल होतं. भडकलेल्या तरुणानं उकळतं तेल मुलाच्या अंगावर टाकलं. गरम तेलामुळे मुलगा भाजला आणि वेदनेनं विव्हळू लागला. ते पाहून आरोपी फरार झाला. कोणीही त्याला पकडण्याचा प्रयत्न केला नाही. पीडित मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या जीवाला आता धोका नाही. सध्या पोलीस आरोपीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.