शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीच्या वेळी आईस्क्रीम न मिळाल्याच्या रागात अज्ञाताने फोडला फ्रीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 22:38 IST

Crime News : वसईतील कौल हेरिटेज सिटीमधील घटना ; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

आशिष राणे

गारेगार गुलाबी थंडीच्या लाटेत चक्क थंडगार आईस्क्रीम खायची लहर आलेल्या अज्ञात इसमाने मेडिकल शॉप मध्ये आईस्क्रीम असून देखील ते न  मिळाल्याच्या रागात चक्क आईस्क्रीम फ्रीजलाच लक्ष करीत तो फोडल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेरामुळे उघडकीस आली आहे.

वसईतील उच्चभ्रू  कौल हेरिटेज सिटीतील  दोषी- अगरवाल संकुलातील मे. वेलनेस मेडिकल शॉपच्या आवारात  रात्री २ च्या सुमारास ही घटना घडली असून तोडफोड करणाऱ्या अज्ञात इसमाने मात्र फ्रिजची तोडफोड केल्यानंतर तेथून पोबारा केला आहेया घडल्या प्रकाराची तक्रार मे.वेलनेस मेडिकल शॉपच्या कर्मचाऱ्यांनी माणिकपूर पोलिसांत केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात इसमावर अदखलपात्र गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केल्याचे माणिकपूर पोलिस निरीक्षक भाऊसाहेब आहेर यांनी लोकमत ला सांगितले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री २ च्या सुमारास कौल सिटी मधील दोषी अगरवाल संकुलात असलेल्या मे वेलनेस मेडिकल हे रात्र- दिवस उघडे असते त्यातच रात्रीच्या वेळी एक अज्ञात इसम मेडिकल शॉप मध्ये आल्यावर त्याने कुठल्याही प्रकारचे  औषध- गोळी न मागता थेट शॉप बाहेर असलेल्या फ्रीज मधील आईस्क्रीमची मागणी केली मात्र  फार्मासिस्टने आपल्याला केवळ औषधेच  मिळतील तर नियमानुसार आम्हाला यावेळी आईस्क्रीम विक्री करता येणार नाही असे सांगताच त्या इसमाने रागाच्या भरात शॉप बाहेरील त्या आईस्क्रीम फ्रीजची सॅनिटाईजर स्टँडच्या सहाय्याने तोडफोड केली व तेथून निघून गेला.

दरम्यान घडला सर्व प्रकार हा शॉप च्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून माणिकपूर पोलिस आता या तोडफोड करण्याऱ्या इसमाचा शोध घेत आहेत तर माणिकपूर पोलिसांनी या इसमास शोधून काढल्यावरच त्या इसमाची खरी माहिती मिळेल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcctvसीसीटीव्हीVasai Virarवसई विरार