शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीवर राग; सासू-मेहुण्यासह स्वत:लाही जाळून संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 08:16 IST

सासू व मेहुण्याचा खून केल्यानंतर आरोपीने त्या दोघांच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून ते जाळून टाकले.

लोकमत न्यूज नेटवर्क वरूड (जि. अमरावती) : मद्यधुंद अवस्थेत सासू व मेहुण्याचा खून केल्यानंतर मारेकरी जावयाने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील वंडली येथे रविवारी उशिरा रात्री उघड झाली. पोलिसांनी घरातून तिघांचेही कोळसा झालेले मृतदेह ताब्यात घेतले. सासू व मेहुण्याचा खून केल्यानंतर आरोपीने त्या दोघांच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून ते जाळून टाकले.

वंडली येथील लताबाई सुरेशराव भोंडे (४७), त्यांचा मुलगा प्रणय सुरेशराव भोंडे (२२) व मारेकरी आशिष ठाकरे (२५, रा. वरूड), अशी मृतांची नावे आहेत. पत्नी नांदायला येत नसल्याने त्याने हे दुहेरी हत्याकांड घडवून आणल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे. रविवारी रात्री वंडली येथे भोंडे यांच्या घरातून धूर निघत असल्याची माहिती  बेनोडा पोलिसांना मिळाली. त्यावरून ठाणेदार स्वप्निल ठाकरे हे अग्निशमन दलासह घटनास्थळावर दाखल झाले. त्या घरात तीन व्यक्तींचे मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत मिळून आले. 

लताबाई भोंडे यांच्या मुलीने सहा महिन्यांपूर्वी आशिष ठाकरे याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. तो पत्नीला  दारू पिऊन नेहमी मारहाण करीत होता. त्यामुळे ती महिनाभरापूर्वी माहेरी वंडली येथे परतली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती