पत्नीवर राग; सासू-मेहुण्यासह स्वत:लाही जाळून संपवले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 08:15 AM2023-09-26T08:15:45+5:302023-09-26T08:16:14+5:30

सासू व मेहुण्याचा खून केल्यानंतर आरोपीने त्या दोघांच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून ते जाळून टाकले.

Anger at wife; Burned himself along with mother-in-law | पत्नीवर राग; सासू-मेहुण्यासह स्वत:लाही जाळून संपवले

पत्नीवर राग; सासू-मेहुण्यासह स्वत:लाही जाळून संपवले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
वरूड (जि. अमरावती) : मद्यधुंद अवस्थेत सासू व मेहुण्याचा खून केल्यानंतर मारेकरी जावयाने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील वंडली येथे रविवारी उशिरा रात्री उघड झाली. पोलिसांनी घरातून तिघांचेही कोळसा झालेले मृतदेह ताब्यात घेतले. सासू व मेहुण्याचा खून केल्यानंतर आरोपीने त्या दोघांच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून ते जाळून टाकले.

वंडली येथील लताबाई सुरेशराव भोंडे (४७), त्यांचा मुलगा प्रणय सुरेशराव भोंडे (२२) व मारेकरी आशिष ठाकरे (२५, रा. वरूड), अशी मृतांची नावे आहेत. पत्नी नांदायला येत नसल्याने त्याने हे दुहेरी हत्याकांड घडवून आणल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे. रविवारी रात्री वंडली येथे भोंडे यांच्या घरातून धूर निघत असल्याची माहिती  बेनोडा पोलिसांना मिळाली. त्यावरून ठाणेदार स्वप्निल ठाकरे हे अग्निशमन दलासह घटनास्थळावर दाखल झाले. त्या घरात तीन व्यक्तींचे मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत मिळून आले. 

लताबाई भोंडे यांच्या मुलीने सहा महिन्यांपूर्वी आशिष ठाकरे याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. तो पत्नीला  दारू पिऊन नेहमी मारहाण करीत होता. त्यामुळे ती महिनाभरापूर्वी माहेरी वंडली येथे परतली होती. 

Web Title: Anger at wife; Burned himself along with mother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.