शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:03 IST

आंध्र प्रदेशातील २४ वर्षीय शिक्षिका माधवीने खासगी फोटो व्हायरल करण्याच्या धमकीमुळे आत्महत्या केली. तिने हातावर वडिलांसाठी 'Take Care पापा' असा संदेश लिहिला होता.

बापासाठी आपली लेक हे त्याचं सर्वस्व असतं. पण याच बापाला 'स्वतःची काळजी घ्या' असं सांगून एका २४ वर्षीय तरुणीने मृत्यूला कवटाळल्याची हृदयद्रावक घटना आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात समोर आली आहे. मानसिक छळ आणि खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या धमकीला कंटाळून माधवी नावाच्या तरुण शिक्षिकेने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने आपल्या हाताच्या तळव्यावर 'Take Care पापा' असं लिहिलं होतं, जो तिचा शेवटचा संदेश ठरला.

नेमकं प्रकरण काय?

माधवी ही पामुरु येथील एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. नोकरीदरम्यान तिची ओळख नागुर भाषा नावाच्या तरुणाशी झाली. हळूहळू या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र, काही काळाने माधवीला नागुरबद्दल एक धक्कादायक सत्य समजले. नागुर हा आधीच विवाहित असून त्याला मुलंही आहेत, हे समजताच माधवीने त्याच्यापासून अंतर राखण्यास सुरुवात केली.

खासगी फोटोंचा धाक आणि ब्लॅकमेलिंग

माधवीने नातं तोडल्यामुळे नागुर संतापला होता. त्याने माधवीला धमकावण्यास सुरुवात केली. दोघांच्या एकत्र असलेल्या वेळचे काही वैयक्तिक आणि आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. आपल्यामुळे वडिलांची आणि कुटुंबाची समाजात बदनामी होईल, या भीतीने माधवी प्रचंड मानसिक तणावाखाली होती. याच दबावातून तिने घरात कुणी नसताना टोकाचे पाऊल उचलले.

हातावर लिहिला शेवटचा संदेश

माधवीने आयुष्य संपवण्यापूर्वी आपल्या हाताच्या तळव्यावर 'Take Care पापा' असे लिहिले. आपल्या वडिलांवर तिचं किती प्रेम होतं आणि आपली बदनामी झाल्यावर त्यांना होणारा त्रास तिला बघवला नसता, हेच या शब्दांतून अधोरेखित होत आहे. तिने गळफास घेतल्याचे समजताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

माधवीच्या मृत्यूला नागुर भाषा हाच जबाबदार असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. एका सुशिक्षित मुलीला अशा प्रकारे आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Daughter's suicide note: 'Take care, Dad' reveals blackmail ordeal.

Web Summary : A young teacher in Andhra Pradesh tragically ended her life due to blackmail over private photos by a spurned lover. Before hanging herself, she wrote 'Take Care Papa' on her hand. Police are investigating the man responsible for driving her to suicide.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAndhra Pradeshआंध्र प्रदेश