शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

...अन् खटल्यातील मदत पडली पाच कोटींना, दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 11:12 IST

याप्रकरणी वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा नोंदवत, दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.

मुंबई : सांताक्रूझमधील व्यापाऱ्याला मुलाला अमेरिकेत नोकरी लावण्यासोबतच जुन्या खटल्यामध्ये मदत करण्याच्या नावाखाली पाच कोटींचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा नोंदवत, दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.

सांताक्रूझ परिसरातील तक्रारदार दलजित मथारू यांचा मोटारगाडी विक्रीचा व्यवसाय करतात.  त्यांच्या तक्रारीवरून गुन्हे शाखेने रवींद्र सहानगर ऊर्फ लक्ष (४०), हनुमंत कांबळे यांना बेड्या ठोकल्या आहेत.  

 लक्ष हा तक्रारदार यांच्या कार्यालयात व्यवस्थापक पदावर कामाला होता. दुकलीने तक्रारदार यांच्या मुलाला अमेरिकेमध्ये नोकरी लावण्याचे, तसेच धनादेश न वटल्याप्रकरणी खटल्यामध्ये मदत करण्याचे आमिष दाखवून चार कोटी ९५ लाख रुपये उकळले. याशिवाय तक्रारदार यांच्याविरोधात केंद्रीय यंत्रणांमध्ये तक्रार असल्याचे सांगितले. त्यामध्येही मदत करण्याचे आश्वासन देऊन पैसे घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा नोंदवत गुन्हे शाखेने अटकेची कारवाई केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी