शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

...अन् फेसबुक फ्रेंडनं महिलेला घातला थोडा थोडका नव्हे, तर ११ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 22:18 IST

बोरिवली येथील एका 43 वर्षीय महिलेला 22 जुलै रोजी अचानक मार्क डेनिलसन नावाच्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली.

ठळक मुद्दे सुनिता शर्माने  सुरुवातील 15 हजार रुपये भरण्यास सांगितले होते. 15 हजाराची रक्कम या महिलेने भरली. या महिलेच्या मुलाने या रशियातील गायकाला फेसबुकवर तुझ्या फोटोचा गैरवापर झाल्याची माहिती दिली.

फेसबुकवर आलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे बोरिवलीतील एका महिलेला महागात पडले आहे. सीमाशुल्क विभागातून (कस्टम) वस्तूची  सोडवण्यासाठी या महिलेला तब्बल 11 लाख रुपयांना गंडा घातल्याची बाब समोर आली आहे. या महिलेने पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.बोरिवली येथील एका 43 वर्षीय महिलेला 22 जुलै रोजी अचानक मार्क डेनिलसन नावाच्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. तिने ती स्वीकारली, त्यानंतर दोघांमध्ये ऑनलाइन चॅटिंग सुरू झाली. या महिलेने तिला चांगलं इंग्रजी येत नाही असंही सांगितले. मात्र, त्याने याची काही अडचण नाही म्हणून चॅट सुरू ठेवलं. काही दिवसांनी त्याने आपला नंबर देऊन ही चर्चा व्हॉट्सअॅपवर सुरु केली. या महिलेनेही त्याच्यावर विश्वास ठेवत अवांतर चॅट सुरु ठेवलं. त्यानंतर डेनिलसनने या महिलेला तो लग्न करण्यासाठी भारतात येणार आहे असं सांगितलं. त्यासाठी त्याने एक पार्सल भारतात पाठवले आहे, मात्र कस्टममध्ये अडकले आहे. अत्यंत मौल्यवान असे हे साहित्य असल्याची बतावणी त्याने केली. नंतर या महिलेला कस्टमधून हे साहित्य सोडवण्यास विनंती केली. या महिलेने डेनिलसनचे साहित्य सोडवण्यास होकार दिला. त्यानंतर सुनिता शर्मा नावाच्या महिलेने  आपण दिल्लीत कस्टम अधिकारी असल्याचं सांगून त्या महिलेला फोन केला.सुनिता शर्माने  सुरुवातील 15 हजार रुपये भरण्यास सांगितले होते. 15 हजाराची रक्कम या महिलेने भरली. त्यानंतर या महिलेकडून वारंवार फोन येण्यास सुरुवात झाली. या महिलेने नंतर 75 हजार रुपये परदेशी चलन भारतीय चलनात बदलण्यासाठी भरण्यास सांगितले. त्यानंतर पैशांची मागणी वाढतच गेली. विमानाच्या लँडिंग चार्जेसाठी तिने तब्बल 2.2 लाख आणि 3.5 लाख कर म्हणून भरण्यास सांगितले. जेव्हा या महिलेनं ही रक्कम भरण्यास नकार दिला, तेव्हा सुनिता शर्माने तिच्या विरोधात पोलीस तक्रार करण्याची धमकी दिली. 13 जून रोजी ही महिलेनं 2.5 लाख बँकेत भरले, तरी देखील पार्सल नेमके कुठे आहे, याबद्दल कोणतीही माहिती समोर न आल्यामुळे तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. त्यानंतर तिने थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस तपासास सुरुवात झाली. या महिलेच्या मुलानेही या डेनिलसन आणि सुनिता शर्मा नावाच्या महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. डेनिलसनच्या नावाने तब्बल 34 फेक फेसबुक अकाउंट असल्याचे उघडकीस आले. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी बँकेचे खाते उघडून ही रक्कम वळवण्यात आली होती. कोल्हापूर, दिल्ली आणि आसाममध्ये या भामट्याने पैसे काढले असल्याचं बँक तपासात उघड झालं आहे. या भामट्या डेनिलसनने अनेक फेक फेसबुक अकाउंट उघडली आहे. यात त्याने रशियातील एका गायकाचा फोटो वापरला आहे. या महिलेच्या मुलाने या रशियातील गायकाला फेसबुकवर तुझ्या फोटोचा गैरवापर झाल्याची माहिती दिली. हे टोळकं श्रीमंत, नोकरी करणाऱ्या विवाहीत महिलांना हेरून त्यांच्याशी मैत्री करुन नंतर फसवणूक करणे, अशी त्यांची मोडस ऑपरेंडी असल्याचे तपासात समोर आले. माहिती टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मेट्रो सिटीत IS ची कमान महिलांच्या हाती; NIAचा मोठा खुलासा

 

Vikas Dubey Encounter : कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर, झाला मोठा खुलासा

 

दहा रुपये, समोसा अन् घडली भयावह घटना; शाळकरी मुलाने गळफास लावून केली आत्महत्या 

 

वेदनादायी! शेतात घुसली म्हणून सांडणीचे कुऱ्हाडीनं कापले पाय; तडफडत सोडला जीव

 

एल्गार परिषद : वरावरा राव यांच्या प्रकृतीचा अहवाल द्या

 

दुर्घटना टळली! पश्चिम रेल्वे मार्गावर एक्सप्रेस आणि ट्रकचा अपघात, जीवितहानी नाही

 

मामा भाच्याला गंडवले, डिलरशिप मिळवून देण्याच्या बहाण्याने तब्बल ८५ लाखांची फसवणूक

 

जमावाकडून पोलिसांना मारहाण, खाजगी दवाखान्याच्या साहित्याची जाळपोळ 

टॅग्स :fraudधोकेबाजीFacebookफेसबुकPoliceपोलिसMumbaiमुंबईMONEYपैसा