शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

अनन्या पांडेची आजही चार तास झाली झाडाझडती; सोमवारी परत होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 19:32 IST

Ananya Panday : एनसीबीने अनन्या पांडेला समन्स बजावलं होतं.

ठळक मुद्देअनन्या पांडेची आज चार तास झाली चौकशी झाली तर काल दोन तास चौकशी झाली.

मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडेची एनसीबीकडून आजची चौकशी संपली. अनन्या पांडे चौकशीसाठी आज दुसऱ्यांदा एनसीबी कार्यालयात हजर राहिली होती. वडील चंकी पांडेही एनसीबी कार्यालयात अनन्यासोबत हजर राहिले होते. अनन्या पांडेची आज चार तास झाली चौकशी झाली तर काल दोन तास चौकशी झाली. ड्रग्स पार्टी प्रकरणात आर्यन खानसोबत झालेल्या चॅटमध्ये अनन्याचं ही नाव पुढे आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एनसीबीने अनन्या पांडेला समन्स बजावलं होतं. सोमवारी पुन्हा पांडेला चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती NCB चे डीजी अशोक जैन यांनी दिली. अनन्याला पुन्हा सोमवारी चौकशीसाठी बोलावलं आहे

बॉलिवूडमध्ये सध्या चित्रपटांपेक्षा वेगळ्या कारणांमुळे चर्चा रंगलीय. अमली पदार्थ, छापेमारी, चौकशी, एनसीबी, आरोप-प्रत्यारोप या सर्व गोष्टींमुळे बॉलिवूड सध्या चर्चेत आलं आहे. ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा सध्या तुरुंगात आहे. आता त्या पाठोपाठ चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे अडचणीत येण्याची शक्यता आहे. आर्यनच्या अटकेने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली असताना आता २१ वर्षीय अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबीच्या रडारवर आली आहे.

काल गुरूवारी एनसीबी अधिकारी अनन्या पांडेच्या घरी धडकले. तसेच शाहरूख खानच्या मन्नत या बंगल्यावरही एनसीबी अधिका-यांनी पाहणी केली. अनन्या पांडे ही आर्यन खान याची मैत्रीण आहे. मिळालेल्या माहितीनुसार आर्यनचे काही व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स एनसीबीच्या हाती लागले आहेत. क्रूझ ड्रग्स पार्टी केसमध्ये आर्यन खानसोबत बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीचे चॅट एनसीबीच्या हाती लागल्याची माहिती आहे. या चॅटमध्ये नशेबाबत बोलणं  झालं होतं. ही अभिनेत्री म्हणजे, अनन्या पांडे असल्याचं समजतंय. त्यामुळे आता अनन्या पांडेची चौकशी सध्या एनसीबी कडून सुरू आहे.पुढील काळात तिच्या चौकशीतून काही निष्पन्न होतं. तसेच या ड्रेस पार्टी प्रकरणाचा लिंक अजून कोणापर्यंत पोहोचतात हे पुढील काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोChunky Pandeyचंकी पांडेAryan Khanआर्यन खानShahrukh Khanशाहरुख खानMumbaiमुंबईDrugsअमली पदार्थ