शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

दुकानाच्या उद्घाटनावेळी अश्लील गाणं; फेमस युट्यूबरला पोलिसांकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 20:14 IST

युट्यूबर थोप्पी (२४) याच्यावर स्थानिक कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर गुरुवारी पोलिसांनी खटला दाखल केला आहे

कोची - केरळच्या मल्लपूरममध्ये नुकतेच एका दुकानाच्या उद्घाटनासाठी आलेल्या युट्यूबरला पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अटक केली आहे. उद्घाटनप्रसंगी आपत्तीजनक विधान करणे आणि गर्दी जमा करुन वाहतुकीला अडथळा केल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी या युट्युबरला कोचीतील एका घरातून अटक केली. उत्तर मलप्पुरमच्या वालंचेरी येथे घेऊन गेल्यानंतर युट्यूबरला अटक करण्यात आली. जेथे काही दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. 

युट्यूबर थोप्पी (२४) याच्यावर स्थानिक कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर गुरुवारी पोलिसांनी खटला दाखल केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. आरोपीचे खरं नाव निहाद असून तो कन्नुर जिल्ह्याचा रहिवाशी आहे. त्याच्या युट्यब चॅनेलचे लाखो फॉलोअर्स असून त्या लहान मुलांचाही समावेश आहे. 

पोलीस अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले की, आम्हाला आरोपीचा दरवाजा तोडावा लागला. कारण, सातत्याने आवाज देऊनही, त्याने दरवाजा  उघडला नाही. आम्ही अर्धा तास वाट पाहिली, तरीही त्याने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे, आम्हाला दरवाजा तोडून आरोपीला ताब्यात घ्यावे लागले. थोप्पीने आपल्या फोनवर लाईव्ह रेकॉर्डींग सुरू केले होते, त्यामुळे पोलीस आल्याची आणि त्याला अटक केल्याची बातमी सोशल मीडियातून सर्वांपर्यंत पोहोचली. 

थोप्पी ज्या कार्यक्रमासाठी उद्घाटक बनून गेला होता, त्या कार्यक्रमाला युवक आणि लहान मुलांचीही मोठी गर्दी जमली होती. या कार्यक्रमात गाणे म्हणतात अश्लील शब्दांचा प्रयोग थोप्पीने केला. त्यामुळे, थोप्पी आणि दुकानाच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.  

टॅग्स :YouTubeयु ट्यूबCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसKeralaकेरळ