शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Kedar Dighe : केदार दिघेंच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांनी पाठवले समन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 14:06 IST

Kedar Dighe : मुख्य आरोपी रोहित कपूर याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. 

Kedar Dighe Shiv Sena: राज्याचे राजकारण सध्या फार विचित्र वळणं घेताना दिसत आहे. सुरूवातीला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकार पाडले. त्यानंतर भाजपासोबत एकत्र येत शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना केली. उद्धव ठाकरेंशी विचारांची फारकत घेताना एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी स्मार्ट खेळी खेळत, आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे (Kedar Dighe) यांना शिंदेंचा गड मानल्या जाणाऱ्या ठाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख बनवले. हा सारा नियुक्त्यांचा खेळ सुरू असतानाच, केदार दिघे यांना एक धक्का बसला आहे. त्यांच्या विरोधात बलात्कार पीडित (Rape Victim) तरूणीला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मुंबईपोलिसांनी केदार दिघेंना समन्स पाठवले आहे. ते चौकशीसाठी कधी उपस्थित राहणार हे पाहावे लागणार आहे. तसेच मुख्य आरोपी रोहित कपूर याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. 

एका बलात्कार पीडित तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या विरोधात ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच रोहित कपूर याच्यावर बलात्काराचा गुन्हा ना. म. जोशी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. लोअर परळ मधील सेंट रेगीज या पंचतारांकीत हॉटेलमध्ये तरूणीवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडित तरूणीने तक्रार करु नये म्हणून केदार दिघे यांनी तिला धमकावल्याचा आरोप केला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी तरूणीवर बलात्कार करणारा रोहित कपूर आणि तिला धमकावणारा म्हणून केदार दिघे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील मुख्य आरोपी रोहित कपूर हा केदार दिघे यांचा मित्र असून त्याने २८ जुलैला लोअर परळ येथील सेंट रेगीज या पंचतारांकित हॉटेलमध्ये तरूणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. धनादेश देण्याच्या बहाण्याने त्याने तरुणीला हॉटेलमध्ये बोलावून बलात्कार केला. त्यानंतर पैसे देऊन याबाबत कुठेही वाच्यता करू नये म्हणून सांगताच तरुणीने नकार दिला. त्यामुळे, दिघे यांनी तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तरुणीने केला आहे. या प्रकरणी भादंवि ३७६, ५०६(२) आदी कलमांतर्गत दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करुन ना. म. जोशी मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसMumbaiमुंबई