सध्या जगाच्या कानाकोपऱ्यातून नात्यांना काळीमा फासणाऱ्या अनेक घटना समोर येत आहेत. यातच आता उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने बाहेर नेऊन आपल्याच पत्नी आणि मुलांना विकल्याचा प्रकार समोर आला आहे. या व्यक्तीने आपल्या पत्नीचा आणि दोन मुलांचा अवघ्या २.२० लाख रुपयांत सौदा केला. इतकंच नाही तर, त्याने पत्नीला धमकी देखील दिली की, जर ती त्या व्यक्तीसोबत गेली नाही तर, तो दोन मुलांना मारून टाकेल.
पतीने दिलेल्या धमकीमुळे घाबरलेली पत्नी दोन मुलांना घेऊन परपुरुषासोबत गेली. मात्र, संधी मिळताच तिने मुलांना घेऊन पळ काढला. महिलेचा आरोप आहे की तिने तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली, परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी पतीसह चार जणांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे आणि आवश्यक ती कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
पतीने पत्नी आणि मुलांना विकलेही धक्कादायक घटना जौनपूरमध्ये घडली आहे. महाराजगंज पोलीस स्टेशन परिसरातील माजिठी गावात राहणारी पीडित शोभावती हिचा विवाह १५ वर्षांपूर्वी सिंगरामाऊ पोलीस स्टेशन परिसरातील खानपूर गावातील रहिवासी राजेशशी झाला होता. लग्नानंतर त्यांना दोन मुले आणि दोन मुली झाल्या. पीडित महिलेचा आरोप आहे की तिचा पती राजेश तिला रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने तिच्या घरातून बादलपूर तहसीलमध्ये घेऊन गेला. तिचा धाकटा मुलगा सर्वेश आणि मुलगी अंशिका देखील तिच्यासोबत गेले. बादलपूरला पोहोचताच पतीने त्याची पत्नी आणि दोन्ही मुलांना पूर्वनियोजित आरोपींना दोन लाख वीस हजार रुपयांना विकले. जेव्हा पीडित महिलेला कळले की तिचा पती तिला विकत आहे, तेव्हा तिने विरोध केला.
मुलांना जीवे मारण्याची धमकी दिलीपण तिला विकत घेणाऱ्या आरोपीने तिला शस्त्राचा धाक दाखवून शांतपणे त्यांच्यासोबत येण्याची धमकी दिली. पीडितेने सांगितले की जर तिने असे केले नाही तर आरोपीने दोन्ही मुलांना मारण्याची धमकी त्यांनी दिली होती. पीडितेचा पती राजेशने आरोपी मुन्शी हरिजन यांना फोन केला, ज्याने दोन लाख वीस हजारांची सौदाबाजी केली आणि दोन ते चार दिवस त्याची सेवा करण्याचे आमिष दाखवून तिला फसवले. पत्नीला विकल्यानंतर आरोपी पतीने त्याच्या सासरच्या लोकांना सांगितले की, त्याची पत्नी दोन्ही मुलांना घेऊन पळून गेली आहे.
पोलिसांनी कारवाई केलीसासरच्यांना त्याच्या कृत्याचा संशय येऊ नये म्हणून पतीने असे म्हटले. दुसरीकडे संधी साधून पीडिता पळून गेली आणि तिच्या माहेरी पोहोचली. तिने तिच्या पालकांना तिच्यावर झालेला अत्याचार सांगितल्यावर, तिच्या पालकांनी तिला महाराजगंज पोलीस ठाण्यात नेले. परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप आहे. जेव्हा जौनपूर पोलिसांनी इतक्या गंभीर प्रकरणातही कोणतीही कारवाई करणे योग्य मानले नाही, तेव्हा पीडितेने वकिलामार्फत जिल्हा न्यायालयात अपील केले.
न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर नोंदवलाप्रकरणाचे गांभीर्य पाहून न्यायालयाने जौनपूर पोलिसांना तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. यानंतर, पोलिसांनी आरोपी पती राजेश, अशोक, मुन्शी हरिजन आणि पत्नीला विकणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.