शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

बापाने अत्याचार केलेल्या आजारी मुलीचा मृत्यू; बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 09:05 IST

उपचार सुरू असलेल्या मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने धाडस करून पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नालासोपारा : बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली आहे. बापानेच २२ वर्षीय मुलीला घरात डांबून तिला मारहाण करत अश्लील चित्रफीत दाखवून अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे. पीडित मुलगी क्षयरोगाने आजारी असतानाही अत्याचार सुरू होते.

उपचार सुरू असलेल्या मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने धाडस करून पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणी नालासोपारा येथे राहत होती. मागील ३ महिन्यांपासून ती क्षयरोगाने आजारी होती. तिला ११ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते; परंतु उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. 

मुलगी होती गर्भवती 

संबंधित प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी तो देत होता. मुलीला तो बळजबरीने घरात डांबून ठेवत होता. त्यामुळे पीडित आणि तिची आई भीतीपोटी गप्प राहत होते. हे प्रकार सातत्याने वाढत होते. या काळात मुलगी गर्भवती झाली होती. त्यावेळी तिचा आरोपी पित्याने बळजबरीने तिचा गर्भपातही केला होता. पीडित मुलीचा मृत्यू हा क्षयरोगाने झाला असल्याची माहिती रुग्णालयाकडून मिळाली असल्याची माहिती नालासोपाऱ्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयसिंह बागल यांनी ‘लोकमत’ला दिली. 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिस