शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

'ड्रंक अँड ड्राइव्ह'ची केस दाखल झाल्याने ठाण्यात तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

By जितेंद्र कालेकर | Published: July 28, 2023 9:38 PM

वाहतूक पोलिसांनी छळ केल्याचा आईला मेसेज, नियमानुसार कारवाईचा पोलिसांचा दावा

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: आपल्यावर ड्रंक अँड ड्राइव्हची केस दाखल झाल्याची तसेच पोलिसांनी हे प्रकरण न्यायालयात दाखल केल्याच्या वैफल्यातून मनिष उतेकर (२४, रा. हनुमाननगर, वागळे इस्टेट, ठाणे) या तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. वाहतूक पोलिसांनी केलेल्या छळामुळे त्याने ही आत्महत्या केली असून याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच न्याय द्यावा, अशी मागणी उतेकर कुटूंबीयांनी केली आहे.

ठाणे शहर वाहतूक शाखेच्या कोपरी युनिटच्या कर्मचार्यांनी गटारी अमावस्येनिमित ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई मद्यपी वाहन चालकांवर केली होती. याच कारवाईमध्ये मनिष आणि त्याचे इतर दोन मित्र मिळाले. चालक मनिषवर मद्य प्राशन करुन वाहन चालविल्याची कलम १८५ नुसार तर त्याच्या अन्य दोन साथीदारांवर कलम १८८ नुसार कारवाई झाली. या कारवाईनंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात जावे लागेल, असे सांगिततले. त्याने मात्र न्यायालयाऐवजी जागीच दंड आकारावा, अशी मागणी केली. प्रकरण न्यायालयात गेल्याने पोलिसही आपले ऐकत नसल्याच्या भावनेतून तसेच यातून झालेल्या मानसिक त्रासातून मनिषने २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घरातच गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.कारवाई कायदेशीर होती.

वाहतूक पोलिसांच्या तपासणीमध्ये त्याच्या शरिरात अल्कोहोल मिळाले होते, तसा गुन्हाही दाखल झाला होता. हे प्रकरण न्यायालयाऐवजी जागीच दंड आकारुन मिटविण्यात यावे, अशी मनिष आणि त्याच्या मित्रांची अपेक्षा होती, असे श्रीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार काबाडी यांनी सांगितले. मेसेजमध्ये उल्लेख केलेल्या नावाचे कोणीही पोलिस वाहतूक शाखेत नाहीत. तरी कुटूंबीयांच्या आरोपांचीही तपासणी केली जाईल, असेही ते म्हणाले.

वाहतूक पोलिस काय म्हणतात?

मद्य प्राशन करुन वाहन चालविल्यानंतर कोपरी वाहतूक पोलिसांच्या कारवाईमध्ये मनिष याच्यासह तिघे मिळाले. या प्रकरणात त्यांनी न्यायालयात जाणे अपेक्षित होते. यात त्यांना दंड झाला असता. त्यांचा कोणीही मानसिक छळ केलेला नाही. ते दुसऱ्या िदवशी येताे, म्हणाले. पण आलेच नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली होती, असे कोपरी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर आव्हाड यांनी सांगितले.

मृत्यूपूर्वी आईला केला मेसेज-

मृत्यूपूर्वी मनिष याने आईला मोबाईलवरुन केलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे की, मला ट्रॅफिक पोलिसांनी पकडले होते. त्यांनी धमकी देऊन सांगितले की, तुम्हाला कोर्टात जावे लागेल. पुष्पक आणि सुधाकर या पोलिसांनी करियर बरबाद करायचे असल्याचे सांगितले. ट्रॅफिक पोलिसांचा मान राखतो. कोणासोबत असे वागू नका, असा मेसेज दाखवत उतेकर कुटूंबीयांनी न्यायाची मागणी केली आहे. काेपरी िब्रजखली म िनषला पकडल्यानंतर पाेलिसांनी मान िसक त्रास िदल्यानेच त्याने आत्महत्या केल्याचा आराेप त्याच्या भावाने केला आहे.

टॅग्स :Drunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हthaneठाणे