शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 19:24 IST

धक्कादायक बाब म्हणजे, या फसवणुकीत वृद्धासोबत त्यांची पत्नीही बळी पडली आणि हे दाम्पत्य तब्बल दीड महिना सायबर गुन्हेगारांच्या तावडीत होते.

सायबर फसवणुकीची प्रकरणे थांबायचे नावच घेत नाहीयत, आणि आता डिजिटल अरेस्ट प्रकरणात मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. त्यांना तंत्रज्ञानाच्या जाळ्यात ओढून, विश्वास संपादन करून आणि शक्य तितकी मोठी रक्कम ऑनलाइन हस्तांतरित करण्यास भाग पाडले जात आहे. अशीच एक घटना चेन्नईमध्ये घडली आहे.

चेन्नईतील एका ८१ वर्षीय वृद्धाला २.२७ कोटी रुपयांचा ऑनलाइन गंडा घालण्यात आला आहे. आरोपींनी त्यांना 'डिजिटल अटक' करून हे पैसे हडपले. यासाठी, गुन्हेगारांनी वृद्धाला एका बनावट व्हर्च्युअल न्यायालयात हजर केले. हे संपूर्ण 'न्यायालय'च एक फसवणूक होती. धक्कादायक बाब म्हणजे, या फसवणुकीत वृद्धासोबत त्यांची पत्नीही बळी पडली आणि हे दाम्पत्य तब्बल दीड महिना सायबर गुन्हेगारांच्या तावडीत होते.

डीटीनेक्स्टच्या अहवालानुसार, ही घटना मार्चच्या मध्यापासून ते एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत घडली. या घटनेत वृद्धाने आपली आयुष्यभराची कमाई गमावली.

अशी घडली फसवणूक

पीडित वृद्धाला १५ मार्च रोजी एक फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःला 'ट्राय'चा (TRAI) अधिकारी असल्याचे भासवले आणि त्यांच्या आधार कार्डवरून कॅनरा बँकेत खाते उघडल्याचा खोटा दावा केला. सुरुवातीला आरोपी हिंदीत बोलत असल्याने वृद्धाला भाषा समजत नव्हती. त्यानंतर, एका तमिळ बोलणाऱ्या व्यक्तीला कॉलवर जोडण्यात आले आणि त्याने वृद्धाला विश्वास दिला की, त्यांचे हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे आणि त्यांना याबद्दल कोणाशीही बोलू नये. आरोपींनी वृद्धाला हे पटवून दिले की, चूक त्यांच्याकडूनच झाली आहे.

धमक्या आणि पैशांची मागणीआरोपींनी वृद्धाकडून त्यांच्या सर्व बँक खात्यांतील पैशांची माहिती मागितली. त्यांना आणि त्यांच्या पत्नीला 'निगराणीखाली' असल्याचे सांगून, घराबाहेर न जाण्याची आणि कोणाशीही न बोलण्याची धमकी दिली. यानंतर, आरोपींनी त्यांच्याकडून ५९ लाख रुपये एका खात्यात हस्तांतरित करण्यास भाग पाडले.

'डिजिटल कोर्ट'चा बनावट देखावा पैसे हस्तांतरित केल्यानंतर, त्यांना ऑनलाइन न्यायालयात सादर होण्याचा आदेश देण्यात आला. वृद्ध आणि त्यांची पत्नी एका डिजिटल कोर्टात हजर झाले. यावेळी एका बनावट न्यायाधीशाला आणण्यात आले होते. या न्यायाधीशाने त्यांना आणि त्यांच्या पत्नीला सात दिवसांसाठी सीबीआयच्या 'डिजिटल अरेस्ट'मध्ये ठेवले जाईल असे सांगितले आणि या प्रकरणाबद्दल पूर्णपणे गप्प राहण्याचे आदेश दिले.

संपूर्ण कमाई लुटली! यानंतर, आरोपींनी पद्धतशीरपणे वृद्धाकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. त्यांच्या मुदत ठेवी (FD) देखील तोडून त्याची रक्कम थोड्या थोड्या हप्त्यांमध्ये हस्तांतरित करण्यास भाग पाडले. अशा प्रकारे, वृद्धाने एकूण २.२७ कोटी रुपये हस्तांतरित केले.

अखेरचा प्रयत्न आणि सत्य उघड एवढे मोठे नुकसान झाल्यानंतरही आरोपी थांबले नाहीत. त्यांनी वृद्धाला आपल्या मुलांकडून आणि मुलींकडून पैशांची व्यवस्था करण्यास सांगितले, इतकेच नाही तर मालमत्ता विकण्यासही सांगितले. अखेरीस, एके दिवशी वृद्धाने आपल्या जावयाला फोन करून बोलावले आणि संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला. आता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमChennaiचेन्नईCrime Newsगुन्हेगारी