शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
4
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
5
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
6
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
7
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
8
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
9
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
10
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
11
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
12
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
13
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
14
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
15
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
16
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!
17
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
18
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "निलेश लंके तू किस झाड की पत्ती है..." अजित पवार यांचा इशारा
20
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'

पत्नीच्या चाैकशीनंतर आला दबावात, अमृतपालला अशी झाली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 6:24 AM

अटकेनंतर तत्काळ आसामच्या दिब्रुगड तुरुंगात रवानगी; चोहोबाजूने घेरून पकडले

लोकमत न्यूज नेटवर्कचंडीगड : महिनाभराहून अधिक काळ फरार असलेला कट्टरपंथी प्रचारक अमृतपाल सिंग याला रविवारी सकाळी पंजाबच्या मोगा जिल्ह्यातून अटक करण्यात आली. रोडे गावात पोलिसांनी चोहोबाजूने घेरून सकाळी ६:४५ वाजता त्याच्या मुसक्या आवळल्या. अटकेनंतर त्याची विशेष विमानाने तत्काळ आसाममधील दिब्रुगड तुरुंगात रवानगी करण्यात आली.  

लष्करी कारवाईत ठार झालेला दहशतवादी जर्नेलसिंग भिंद्रनवाले हा रोडे गावातील असून, अमृतपाल सिंग याची गेल्यावर्षी याच गावात आयोजित एका कार्यक्रमात ‘वारीस पंजाब दे’ संघटनेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. पोलिस महानिरीक्षक सुखचैन सिंग गिल यांनी येथे पत्रकार परिषदेत अमृतपालच्या अटकेची घोषणा केली. ते म्हणाले, अटकेनंतर अमृतपालला राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (रासुका) आसाममधील दिब्रुगड येथे नेण्यात आले आहे. अकाल तख्तचे माजी जत्थेदार जसबीर सिंग रोडे यांनी दावा केला की, अमृतपालने आत्मसमर्पण केले आणि तेही त्यावेळी उपस्थित होते. त्यांनी मोगा येथे पत्रकारांना सांगितले की,  सर्वप्रथम केंद्रीय संस्थांशी संपर्क केला.  त्यानंतर त्यांनी पंजाब पाेलिसांना संपर्क केला. अमृतपालने मेळाव्याला संबोधित केले आणि नंतर आत्मसमर्पण करण्यासाठी गुरूद्वारातून बाहेर पडला. 

अशी झाली अटक n अमृतपालने आत्मसमर्पण केले असते तर गावात तणाव निर्माण झाला हाेता. अमृतपाल शनिवारी रात्री गावात दाखल झाला. n दुपारी आत्मसमर्पण करण्याची याेजना हाेती. मात्र, पाेलिस सकाळीच पाेहाेचले. संपूर्ण गावाला घेराव टाकला. काही अधिकारी साध्या वेशात गावात दाखल झाले. n पळण्यासाठी कुठलाही मार्ग न राहिल्यामुळे ताे बाहेर आला आणि त्याला अटक करण्यात आली.

शांतता भंग करणाऱ्यांवर कारवाई होईल जे लोक शांतता आणि सद्भावना बिघडवण्याचा प्रयत्न करतात आणि देशाचा कायदा मोडतात, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल. आम्ही कोणत्याही निष्पाप व्यक्तीला त्रास देणार नाही. आम्ही सुडाचे राजकारण करत नाही. या ३५ दिवसांत शांतता आणि सलोखा राखल्याबद्दल मी पंजाबच्या ३.५ कोटी जनतेचे आभार मानतो.    - भगवंत मान, मुख्यमंत्री, पंजाब

पत्नीच्या चाैकशीनंतर आला दबावातn अमृतपालची पत्नी किरणदीप काैर यांना दाेन दिवसांपूर्वी लंडनला जाण्यापासून सुरक्षा दलांनी राेखले. त्यांची चाैकशी करण्यात आली. तसेच विविध कागदपत्रांनी त्यांच्याकडून लेखी नाेंद करून घेण्यात आली. n किरणदीप यांनी त्यास विराेध केला हाेता. मात्र, त्यांच्या चाैकशीनंतरच अमृतपाल दबावाखाली आला. त्याच्या अटकेबाबत गृहमंत्री अमित शाह यांनीही इशारा दिला हाेता. पाेलिसांनी त्याच्या एकेक साथीदाराला अटक केली. साथीदार पापलप्रीत सिंग अटक झाल्यानंतर त्याला लपण्यासाठी जागाही मिळेनासी झाली हाेती. ताे एकटा पडला आणि त्याच्या भाेवती फास आवळत गेला.

गुरूद्वाराचे पावित्र्य राखले...अमृतपाल हजर असलेल्या गुरूद्वाराचे पावित्र्य राखण्यासाठी पोलिस आत गेले नसल्याचे त्यांनी सांगितले. गुरूद्वाराच्या आत काय घडले आणि आत अमृतपाल काय बोलला, यावर भाष्य करणे योग्य नाही. गेल्या ३५ दिवसांपासून ही मोहीम सुरू होती, असेही गिल यांनी सांगितले.

आत्मसमर्पणाचा दावा पाेलिसांनी फेटाळलासोशल मीडियावर आलेल्या एका व्हिडीओमध्ये खलिस्तान समर्थक अमृतपालने आत्मसमर्पण केल्याचा दावा केला आहे. त्याचा हा दावा फेटाळून लावताना गिल म्हणाले की, पंजाब पोलिसांना रोडे गावात त्याच्या उपस्थितीची माहिती मिळाली आणि पोलिसांनी गावासह त्याला चारही बाजूंनी घेरले, त्याच्या सुटकेची कोणतीही संधी सोडली नाही. 

 

 

टॅग्स :chandigarh-pcचंडीगढ़PoliceपोलिसAmritpal Singhअमृतपाल सिंग