शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

नागपुरात प्रयोगशाळा सहायिकेने विभागप्रमुख महिलेवर फेकला अमोनिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:40 IST

सदरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये वेतन थांबविल्यामुळे प्रयोगशाळा सहायक महिलेने विभागप्रमुख असलेल्या महिलेवर अमोनिया नावाचे रसायन फेकले.

ठळक मुद्देशासकीय तंत्रनिकेतनमधील घटना : वेतन थांबविल्यामुळे काढला राग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सदरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये वेतन थांबविल्यामुळे प्रयोगशाळा सहायक महिलेने विभागप्रमुख असलेल्या महिलेवर अमोनिया नावाचे रसायन फेकले. सुदैवाने विभागप्रमुख सतर्क असल्यामुळे त्यांना दुखापत झाली नाही. बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे पोलिसात खळबळ उडाली. सदर पोलिसांनी अमोनिया फेकणाऱ्या महिला कर्मचाºयास ताब्यात घेतले. परंतु विभाग प्रमुखांनी तक्रार न केल्यामुळे तिची सुटका करण्यात आली.अमोनिया फेकणारी महिला प्रयोगशाळा सहायक आहे. ती पूर्वी आयटी विभागात कार्यरत होती. डिसेंबर महिन्यात परवानगी शिवाय कामावर न आल्यामुळे आयटी विभागाच्या प्रमुखांनी प्रयोगशाळा सहायकाचा वरिष्ठांना अहवाल पाठविला होता. यामुळे प्रयोगशाळा सहायक महिलेचे डिसेंबर महिन्याचे वेतन थांबविण्यात आले होते. तिची १ जानेवारीला आयटी विभागातून रसायनशास्त्र विभागात बदलीही करण्यात आली होती. बदली केल्यानंतर ती ६ जानेवारीला नोकरीवर हजर झाली. वेतन थांबविल्यामुळे ती रागात होती. बुधवारी दुपारी १ वाजता आयटी विभागप्रमुख आपल्या कक्षात हजर होत्या. त्यावेळी प्रयोगशाळा सहायक महिला अमोनियाने भरलेला ग्लास घेऊन तेथे पोहोचली. तिने कक्षात प्रवेश करताच विभागप्रमुखावर अमोनिया फेकला. सतर्क असल्यामुळे विभागप्रमुखांनी आपला दुपट्टा समोर केला. यामुळे अमोनिया विभागप्रमुखाच्या शरीराऐवजी दुपट्ट्यावर पडला. अमोनिया फेकल्यानंतर प्रयोगशाळा सहायक तेथून निघून गेली. घटनेची माहिती मिळताच कॉलेज परिसरात खळबळ उडाली. वरिष्ठांनी चौकशी केली असता अमोनिया फेकल्याची माहिती मिळाली. दरम्यान कॉलेजच्या बाहेर अ‍ॅसिड फेकल्याची अफवा पसरल्यामुळे कॉलेजमधील वरिष्ठांचे फोन येणे सुरु झाले. दुपारी २.१५ नियंत्रण कक्षाला अ‍ॅसिडने हल्ला केल्याची सूचना देण्यात आली. नियंत्रण कक्षाने सदर पोलिसांना कळविले. सदरचे ठाणेदार महेश बनसोड सहकाऱ्यांसह शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पोहोचले. त्यांनी आयटी विभागप्रमुखांची चौकशी केली. त्यांनी अमोनिया फेकल्याची माहिती दिली. पोलिसांनी प्रयोगशाळा प्रमुखांची चौकशी केली असता त्यांनी ग्लासमध्ये अमोनिया असल्याचे सांगितले. पोलीस अमोनिया फेकणाºया प्रयोगशाळा सहायक महिलेस ताब्यात घेऊन ठाण्यात आले. त्यांनी विभागप्रमुख महिलेस तक्रार देण्यास सांगितले. परंतु काही वेळानंतर विभागप्रमुख महिलेने तक्रार देण्यास नकार दिल्यामुळे पोलिसांनी प्रयोगशाळा सहायक महिलेची सुटका केली. प्रयोगशाळेत अमोनियासह अनेक रसायन ठेवले होते. प्रयोगशाळा सहायक महिलेने घातक रसायनाने हल्ला केला असता तर गंभीर दुखापत झाली असती.अनेक दिवसांपासून होती त्रस्तअमोनिया फेकणारी प्रयोगशाळा सहायक महिला मागील अनेक दिवसांपासून खाजगी कारणांमुळे त्रस्त होती. त्यामुळे ती नियमित कामावर येत नव्हती. वेतन थांबविल्यामुळे तिला राग आला. पोलिसांनी पकडल्यानंतर ती रडत होती. पोलिसांनी तिची समजूत घालून तिला शांत केले. तिची अवस्था पाहून विभागप्रमुखांनी तिच्या विरुद्ध तक्रार केली नसल्याची माहिती आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर