शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ
2
पाकच्या मदतीसाठी चीनने उभारले बंकर; नियंत्रण रेषेलगत कम्युनिकेशन टॉवरही बांधले!
3
सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच
4
१८ वर्षांनी राहु शनी नक्षत्रात गोचर: ७ राशींना लॉटरी, शेअर बाजारात फायदा; प्रमोशन, धनलाभ योग!
5
तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? जून महिन्यात ठरतील लकी, लाभेल सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!
6
वीकएण्डचा वाजणार बोऱ्या! मध्य रेल्वेवर उद्यापासून तीन दिवस जम्बो ब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द
7
मनुस्मृती दहन करताना आमदार आव्हाड यांनी फाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो
8
कीर्ती व्यास हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप; अत्यंत थंड डोक्याने कृत्य केल्याचा वकिलांचा युक्तिवाद
9
Porsche Car Accident: 'बाळा'च्या ब्लड सँपलची ससून रुग्णालयात अदलाबदल; ते खासगी इसम कोण?
10
सचिन वाझेच्या तुरुंगाबाहेर पडण्याबाबतच्या अर्जावर उत्तर द्या; उच्च न्यायालयाचे सीबीआयला निर्देश
11
सरकारी कर्मचारी भ्रष्ट म्हणणे तक्रारदाराला भाेवले; कारवाई रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
12
राधानगरीतील ८४ गावांत वाढणार इको टुरिझम; MSRDCकडून विकास आराखड्याचे काम सुरू
13
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
14
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
15
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
16
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
17
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
18
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
19
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
20
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर

आंबोलीत गैरसमजुतीतून जमावाची पोलिसाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 3:11 PM

यात कॉन्स्टेबलसह एक अधिकारी जखमी झाला असून, या प्रकरणी आंबोली पोलिसांनी एन. खरोडिया (२८) या तरुणाला अटक केली आहे.

मुंबई - विनाहेल्मेट वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईदरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याचा बनाव चालकाने आखल्याने गैरसमजुतीतून जमावाने पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकार अंबोलीत उघडकीस आला आहे. यात कॉन्स्टेबलसह एक अधिकारी जखमी झाला असून, या प्रकरणी आंबोली पोलिसांनी एन. खरोडिया (२८) या तरुणाला अटक केली आहे.बुधवारी दुपारी आंबोली पोलिसांकडून विनाहेल्मेट गाडी चालविणाऱ्यांवर कारवाई सुरू होती. त्या वेळी पोलीस कॉन्स्टेबल सागर कोंडविलकर (२८) यांनी खरोडिया याला अडविले आणि दंडाची रक्कम भरण्यास सांगितले. मात्र, दंड न भरताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्या वेळी झालेल्या झटापटीत त्याने कोंडविलकर यांच्या हातावर एक जोरदार फटका मारला. त्यामुळे कोंडविलकर यांच्या हाताला गंभीर दुखापत होऊन त्यांच्या हातातून रक्तस्राव होऊ लागला. त्याच हाताने कोंडविलकर यांनी खरोडिया याचे शर्ट पकडले त्यामुळे त्याचे शर्ट रक्ताने माखले. मात्र त्याने आरडाओरड करीत त्या ठिकाणी जमावाला गोळा केले आणि कोंडविलकर यांनी त्याला मारल्याचा बनाव केला.जमलेल्या लोकांनाही त्याचा रक्ताळलेला शर्ट पाहून त्याचे बोलणे खरे वाटले. त्यामुळे तेथे जमलेल्या लोकांनी कोंडविलकर यांच्यावर हल्ला चढविला. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात पोलीस निरीक्षक सरगर जखमी झाले. तसेच जमावाने पोलिसांच्या एका गाडीची काचदेखील फोडली. अखेर अतिरिक्त मनुष्यबळ मागवत पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणली आणि खरोडिया याला अटक करून पोलीस ठाण्यात आणले. त्याच्यावर संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांनी सांगितले. मात्र, या घटनेनंतर पुन्हा पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक