शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

सायलेंट किलिंगमागे आर्थिक व्यवहारही; धागेदोरे शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 09:40 IST

या प्रकरणात हत्येसाठी आर्थिक व्यवहार झाल्याचेही उघड झाल्याने त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.  

मुंबई : मूकबधिर अर्शदअली सादीकअली शेख याच्या हत्या प्रकरणामागचे आणखी कंगोरे उलगडण्यासाठी पोलिसांनी दुभाषाच्या मदतीने या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी मूकबधिर जय चावडा, शिवजित सिंग आणि रुक्साना शेख यांची एकत्रित चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात हत्येसाठी आर्थिक व्यवहार झाल्याचेही उघड झाल्याने त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.  

पायधुनी पोलिसांनी अटक केलेल्या रुक्सानाला न्यायालयाने १२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. रुक्साना आणि जय यांच्यात २०२२ पासून विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. अर्शदचा अडसर कायमचा दूर करण्यासाठी जय त्याची हत्या करणार आहे, याची पूर्ण कल्पना रुक्सानाला होती.

हत्या, हत्येआधी केलेली अमानुष मारहाण जयने रुक्सानालाही व्हिडीओ कॉलद्वारे दाखवली होती. अर्शदचा मृतदेह पाहिल्यानंतर रुक्सानाला दुःख वगैरे काहीच झाले नाही. तिने हत्या झाल्याचे लपवून ठेवले. 

बेल्जियमच्या सीमचे रहस्य काय?-    या हत्येत आरोपी रुक्साना, जय आणि शिवजित सिंग यांच्यात आर्थिक व्यवहारही झाल्याचे तपासातून स्पष्ट होत आहे. पोलिस त्याबाबत अधिक चौकशी करत आहेत.-    मोबाइलमधील पुराव्यांसह गुन्ह्यात अन्य कोणी सामील आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत. -    बेल्जियमधील सीम कार्डच्या आधारे अर्शदच्या हत्येचा व्हिडीओ मूकबधिरांच्या ग्रुपला दाखवणारा मुख्य आरोपी जयचा मित्र आहे. याबाबत आरोपींची चौकशी सुरू आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस