शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
2
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
3
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
4
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
5
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
6
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
7
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
8
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
9
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
10
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
11
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
12
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
13
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
14
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
15
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
16
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
17
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
18
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
19
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
20
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर पालिकेच्या साफसफाई, कचरा वाहतूक ठेक्यात ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप

By धीरज परब | Updated: January 18, 2024 15:05 IST

गुन्हा दाखल करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: मीरा भाईंदर महापालिकेने शहरातील दैनंदिन साफसफाई व कचरा संकलन-वाहतूक साठी दोन ठेकेदारांना दिलेल्या ठेक्यात ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागा मार्फत चौकशी करून भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष व  मीरा भाईंदर १४५ विधानसभा निवडणूक प्रमुख ऍड. रवी व्यास यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापालिका आयुक्त संजय काटकर यांच्या कडे या बाबत लेखी तक्रार त्यांनी केली आहे.

महापालिकेत ऍड . रवी व्यास यांनी कचरा ठेक्यात घोटाळा झाल्याचे सांगितले . यावेळी त्यांच्या सोबत माजी सभापती सुरेश खंडेलवाल व पंकज पांडेय, गजेंद्र भंडारी  आदी उपस्थित होते . व्यास म्हणाले कि, भाईंदर महापालिकेने साफसफाई व कचरा वाहतुकी साठी प्रभाग समिती १ , २ व ३ चा १ झोन करून त्याचे कंत्राट ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंटला जुलै २०२३ मध्ये दिले आहे . तर त्या आधी प्रभाग समिती ४, ५ व ६  मिळून झोन २ साठी  मे. कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. यांना मार्च २०२३ मध्ये ठेका दिला आहे . सदर ठेका ५ वर्षां साठी आहे.

२०१२ मध्ये ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट ला साफसफाईचे कंत्राट देताना पहिल्या वर्षी ३९ कोटी व नंतर दरवर्षी वाढत जाऊन २०२३ मध्ये ९० कोटी पर्यंत पोहचले होते. ठेकेदाराची वाहने , कामगार आदी धरून देखील २०२३ मध्ये ९० कोटी वर्षाला खर्च केला असताना नव्याने कंत्राट देताना तब्बल १५० कोटी रुपये पहिल्या वर्षात खर्च केले जाणार आहेत . शिवाय दरवर्षी त्यात वाढ केली जाणार आहे. ठेक्यात सफाई कामगारांना किमान वेतन नुसार प्रतिदिन १ हजार ३३ रुपये देय असताना प्रतिदिन १ हजार ३९९ रुपये निश्चित करून पैसे ठेकेदारास दिले जात आहेत . रोज सुमारे १८०० सफाई कामगार काम करत असल्याचे विचारात घेता रोज प्रति कामगारच्या नावाखाली ३६६ रुपये जास्त देऊन ५ वर्षां करता तब्बल १२० कोटी २३ लाख रुपये ठेकेदारांना जास्त मिळणार आहेत. बोनस व ग्रॅच्युटी सुद्धा मासिक देयकात दिली जात आहे.

आधीच्या ठेक्यात कचरा वाहक वाहने हि ठेकेदाराची होती व ३ टन क्षमतेच्या वाहना साठी रोज ७ हजार ८२६ रुपये पालिका देत होती . परंतु आता तर कचरा वाहक वाहने हि पालिकेची असून देखील ठेकेदारास प्रति वाहन दररोज १३ हजार २०० रुपये पालिका देत आहे . पालिकेचे वाहन आणि पैसे देखील जास्त असा हा गैरप्रकार असून प्रतिदिन ५ हजार ३७४ रुपयांचा फरक पाहता ५  वर्षात ठेकेदारास १८० कोटी ४४ लाख रुपये जास्त दिले जाणार आहेत . कचरा गाड्यांवर लागणारे कामगार हे प्रति वाहनाच्या खर्चात समाविष्ट असताना वाहनांवर कामगार मात्र १८०० कामगारां मधीलच घेतले जात आहेत असा आरोप यावेळी व्यास यांनी केला आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी संगनमत करून  हे दोनच ठेकेदार पात्र ठरतील त्यानुसार निविदेच्या अटीशर्ती तयार केल्या . झोन २ मध्ये ग्लोबल ने निविदा भरली असताना त्यांनी ती मागे घेतली व कोणार्कचा मार्ग मोकळा केला . निविदा मागे घेतल्याने ग्लोबलची अनामत रक्कम जप्त करून त्याला काळया यादीत टाकणे आवश्यक असताना पालिकेने तसे केले नाही . दोन्ही ठेकेदारांना प्रचंड आर्थिक फायदा करून घेण्यासाठी पालिकेने संगनमताने हे कारस्थान करून महापालिका आणि शहरातील करदात्या नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान चालवले आहे . आवश्यक तांत्रिक मंजुरी ठेका देताना घेतली नाही . सुमारे ५०० कोटींचा हा घोटाळा असल्याचा आरोप करत दोन्ही ठेकेदारांचे ठेके रद्द करून त्यांना काळ्या यादीत टाकणे व लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडून चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याचे यावेळी ऍड. रवी व्यास यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी