शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
3
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
4
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
5
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
6
रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
7
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
8
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
9
विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले
10
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
11
प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
12
क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला
13
चॅटजीपीटीचा वापर करून २ बहिणींनी केली कमाल; वाचवले तब्बल १० हजार डॉलर्स
14
‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!
15
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
16
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

Aligarh: "मी लग्न करेन, पण एका अटीवर..."; सासूसोबत पळून गेलेला जावई काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 16:01 IST

Aligarh Love Story: अलिगडमधून फरार झालेल्या सासू आणि जावयाला बुधवारी पोलिसांनी पकडलं. सध्या दोघांचीही चौकशी सुरू आहे.

अलिगडमधून फरार झालेल्या सासू आणि जावयाला बुधवारी पोलिसांनी पकडलं. सध्या दोघांचीही चौकशी सुरू आहे. दोघांनीही त्यांचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. दोघांनाही आता एकत्र राहायचं आहे. होणाऱ्या सासूसोबत पळून गेलेला जावई राहुल म्हणाला की, मी तिच्याशी लग्न करण्यास तयार आहे. बाकी तिची इच्छा आहे.

"माझी सासूवर वाईट नजर नव्हती. तिचा नवरा तिला त्रास द्यायचा. तो तिला मारहाण करायचा आणि खूप शिवीगाळ करायचा. ती तिच्याच पतीवर खूप नाराज होती आणि तिच्या कुटुंबातील सदस्यही तिला सपोर्ट करत नव्हते. मग ती माझ्याशी बोलू लागला आणि तिने मला सर्व काही सांगितलं. ६ एप्रिल रोजी मी खरेदीसाठी बाहेर गेलो होतो तेव्हा मला तिचा फोन आला आणि ती म्हणाली की जर तू मला घ्यायला आला नाहीस तर मी मरेन. तिने कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नये म्हणून मी तिथे गेलो होतो."

"मी तिच्याशी लग्न करण्यास तयार"

"आम्ही दोघे कासगंजमध्ये भेटलो. त्यानंतर ७ एप्रिल रोजी मुझफ्फरपूरला पोहोचलो. जेव्हा आम्हाला कळलं की पोलीस आम्हाला शोधत आहेत, तेव्हा आम्ही विचार केला की सरेंडर होऊया. मग आम्ही दादोन पोलीस स्टेशनला पोहोचलो. लग्न आणि बाकी सर्व तिच्यावर अवलंबून आहे. जर तिची इच्छा असेल तर मी तिच्याशी लग्न करण्यास तयार आहे. ती जे काही म्हणेल ते होईल. अट फक्त एवढीच आहे की तिची इच्छा असावी. मला फक्त तिच्यासोबत राहायचं आहे. वयामुळे काही फरक पडत नाही" असं राहुलने म्हटलं आहे. 

" राहुल खूप चांगला आहे"

सासू अपना देवी म्हणाली की, माझ्या पतीला मी जावयाशी बोललेलं आवडत नव्हतं. एकदा त्याने तर तू राहुलसोबत पळून जा असं म्हटलं होतं. आता जर पतीने असा आरोप केला तर पत्नीचं काय होईल? मग मी राहुलला या सर्व गोष्टी सांगितल्या. राहुल खूप चांगला आहे. त्याला माझी बाजू समजली. आम्ही दोघांनी आपापसात ठरवलं की, आता आपल्याला एकत्र राहायचं आहे. घरातून पळून गेल्यानंतर आम्ही दोघे कासगंजमध्ये भेटलो.

"मी राहुलला माझा नवरा म्हणून स्वीकारलं"

आम्ही दोघेही बसने बरेलीला पोहोचलो. येथून आम्ही बिहारला जाणारी बस पकडली आणि बिहारमधील मुझफ्फरपूरला गेलो. तिथे एका हॉटेलमध्ये राहिलो होतो. राहुल नोकरी शोधत होता. आम्ही दोन दिवसांपूर्वी आमचे फोन चालू केले. आम्हाला सोशल मीडियावरून कळलं की पोलीस दोघांनाही उत्तराखंडमध्ये शोधत आहेत. आम्ही बसमध्ये बसलो आणि मुझफ्फरपूरहून दिल्लीला पोहोचलो. मी राहुलला माझा नवरा म्हणून स्वीकारलं आहे. आता तो माझा नवरा आहे असं सासूने म्हटलं आहे. 

धक्कादायक! सासू आधी शेजारच्या गावातील महिलेसोबत गेलेला पळून; जावयाचा नवा कारनामा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल याआधीही एका महिलेसोबत पळून गेला होता. ती महिला शेजारच्या गावातील होती. दोघेही दोन महिन्यांनी घरी परतले. त्यावेळी महिलेच्या कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार केली नाही, त्यामुळे कोणतीही कारवाई झाली नाही. यावेळी राहुल त्याच्या होणार्‍या सासूसोबत पळून गेला. जितेंद्र आणि अनिता यांच्या मुलीचं लग्न १६ एप्रिल रोजी राहुलशी होणार होतं. लग्न ठरल्यानंतरच्या तीन महिन्यांतच राहुल आणि अनिता एकमेकांच्या प्रेमात पडले. ते तासनतास फोनवर बोलत असत.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश