शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

दिल्लीत एअर होस्टेससोबत अत्याचार, तिने आरोपीला रूममध्ये बंद केलं अन् पोलिसांना बोलवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 09:23 IST

Crime News : पीडित तरूणी कशीबशी तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरली. त्यानंतर  तिने बाहेरून रूमचा दरवाजा बंद केला.

Crime News :  दिल्लीच्या (Delhi Crime News) महरौलीमधून रेपची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे पोलिसांनी एका स्थानिक नेत्याला एअर होस्टेसवर अत्याचार केल्याबाबत अटक केली आहे. आरोपी यावेळी नशेत होता. आरोप आहे की, स्थानिक नेत्याने घर भाड्याने देण्याच्या बहाण्याने पीडितेच्या घरी येऊन तिच्यावर रेप केला. पीडित तरूणी कशीबशी तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरली. त्यानंतर  तिने बाहेरून रूमचा दरवाजा बंद केला. पोलिसांनी त्याला अटक केली.

पोलिसांनुसार, पीडित तरूणी एका भाड्याच्या घरात राहत आहे आणि एका मोठ्या एअर लाइन कंपनीत एअर होस्टेस आहे. पीडिता यूपीच्या संभलमधील राहणारी आहे. पीडितेने दिलेल्या जबाबानुसार, ती तिच्यासाठी दुसरं भाड्याचं घर शोधत होती. घर शोधत असताना साधारण दीड महिन्याआधी तिची भेट हरजीत यादवसोबत झाली. 

हरजीतने पीडितेला घर शोधून देतो असं सांगितलं होतं. त्याबाबत त्यांचं नेहमीच फोनवर बोलणंही होत होतं. पीडितेच्या जबाबानुसार, 25 सप्टेंबरच्या राती हरजीत नशेत असताना पीडितेच्या घरी पोहोचला. त्याने एक घर शोधल्याचा दावा केला. त्यामुळे पीडितेने त्याला घरात बोलवलं.

घरात गेल्यावर हरजीतने पीडितेसोबत अत्याचार केला. विरोध केला तर पीडितेला मारहाण करण्यात आली. दरम्यान पीडितेने आरोपीला धक्का दिला आणि ती रूमबाहेर जाण्यात यशस्वी ठरली. तिने बाहेरून रूमचा दरवाजा बंद केला. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने तिने पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला अटक केली.

पोलिसांनुसार, ही घटना दिल्लीच्या महरौलीची आहे. इथे पीडितेने सांगितल्यानुसार, आरोपीला अटक करून तुरूंगात पाठवण्यात आलं आहे. पीडितेचा मेडिकलनंतर जबाब घेण्यात आला.

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळ