शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर व्हाया मुंबई; पोलिसांनी अपहरणाचा डाव उधळला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 21:35 IST

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अहमदनगर पोलीस करत असल्यामुळे आरोपीचा ताबा त्यांना देण्यात आला आहे.

ठळक मुद्देअहमदनगरमध्ये राहणारी मुलगी १५ वर्षीय आहे. ढगेने मुलगी पळवून आणल्याचे कळाल्यानंतर नातेवाईकांनी त्याला हाकलून लावले.तपासात ढगेने दोन लग्न केली असून दोन्ही बायका त्याला सोडून गेल्या असल्याचं उघडीकस आलं आहे.

मुंबई -  वडाळा पोलिसांनी अवघ्या एका तासात मुलीच्या अपहरणाचा डाव उधळून लावत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. काकासाहेब ढगे (२०) असं या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अहमदनगर पोलीस करत असल्यामुळे आरोपीचा ताबा त्यांना देण्यात आला आहे.

अहमदनगरमध्ये राहणारी मुलगी १५ वर्षीय आहे. आई-वडिलांचे लहानपणी निधन झाल्यामुळे अल्पवयीन मुलगी तिच्या मावशीकडे राहत होती. काही दिवसांपूर्वी मुलगी शेतात एकटी काम करत असताना ढगेने तिला धमकावून पळवून मुंबईत आणले. त्याने प्रथम मुलीला बीडच्या आष्ठी येथे नातेवाईकांकडे नेले. ढगेने मुलगी पळवून आणल्याचे कळाल्यानंतर नातेवाईकांनी त्याला हाकलून लावले. तेथे दोन आठवडे थांबल्यानंतर तो तिला घेऊन पोकरी अहमदनगर येथे नातेवाईंकांकडे गेला. तेथे तो महिनाभर राहिला. पोकरीत त्याने लाकूड व्यवसाय सुरू केला होता. मात्र तेथेही नातेवाईकांना त्याच्यावर संशय आल्यानंतर त्याने तेथून मुलीला घेऊन पळाला. नंतर त्याने पंढरपूर गाठले. त्या ठिकाणी तो मित्राच्या घरी दोन दिवस राहिला. त्यानंतर पुन्हा पोकरीला येऊन नातेवाईकांना विनवण्या करून थांबला. १० दिवसानंतर तो मुलीला घेऊन मुंबईच्या वडाळा परिसरात आला. ही बातमी मुलीच्या घरातल्यांना कळाल्यानंतर त्यांनी रविवारी वडाळा पोलीस ठाण्यात येत पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम कोकणे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ढगेने वडाळातील मिठाघर परिसरात मुलीला पळवून आणले असल्याचे सांगितले. पोलिसांनी खबऱ्यांच्या मदतीने एका तासात ढगेचा शोध लावत त्याला पोलीस ठाण्यात आणले. पीडित मुलीचा ताबा तिच्या नातेवाईंकांना दिला असून ढगेचा ताबा पुढील तपासासाठी अहमदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तपासात ढगेने दोन लग्न केली असून दोन्ही बायका त्याला सोडून गेल्या असल्याचं उघडीकस आलं आहे. त्याने मुलीच्या बालबुद्धीचा फाय़दा घेऊन तिला धमकवून पळवून आणल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिसAhmednagarअहमदनगरArrestअटक