शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अरे बापरे! बॉयफ्रेंडसह मिळून मुलीने आपल्याच घरात डल्ला मारला, कपाटातला लॉकर चोरला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 15:09 IST

एका १६ वर्षीय मुलीने तिच्या बॉयफ्रेंडसह मिळून तिच्याच घरातून लॉकर चोरला. ही चोरी घरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

अहमदाबादमधील शेला भागात एका १६ वर्षीय मुलीने तिच्या बॉयफ्रेंडसह मिळून तिच्याच घरातून लॉकर चोरला. ही चोरी घरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी मुलगी आणि तिच्या बॉयफ्रेंडविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना २९ सप्टेंबर २०२४ रोजी अहमदाबादमधील शेला येथील एका अपार्टमेंटमध्ये घडली. कपाटात लॉकर ठेवला होता. लॉकरमध्ये काडतुसं, लायसन्स, पासपोर्ट, सोन्याचे दागिने आणि १.५६ लाख रुपयांच्या  मौल्यवान वस्तू होत्या.

वडील त्यांच्या स्कूटरचे कागदपत्रं शोधत असताना त्यांना लॉकर गायब असल्याचं समजलं. घरात त्यांनी शोधाशोध केली. पण काहीच सापडलं नाही. त्यानंतर वडिलांनी अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. फुटेज पाहिल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला कारण त्यात त्यांची मुलगी आणि एक तरुण लॉकर घेऊन जात असल्याचं दिसत होते.

जेव्हा वडिलांनी आपल्या मुलीला विचारलं तेव्हा तिने कोणतंही स्पष्ट उत्तर दिलं नाही. नंतर कळलं की, व्हिडिओमध्ये दिसणारा तरुण ऋतुराज सिंह चावला आहे, जो कांकरियाच्या बोर्डी मिल परिसरातील रहिवासी आहे. मुलीने चोरी केली नसल्याचं म्हटलं आणि तिने दुसरा बॉक्स उचलला, ज्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू होत्या असं सांगितलं.

लॉकरमध्ये काडतुसं आणि महत्त्वाची कागदपत्रं असल्याने वडिलांनी बापल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ऋतुराज सिंहला अटक करून चौकशी सुरू केली.

चौकशीदरम्यान असं उघड झालं की, मुलगी आणि ऋतुराज दोन वर्षांपूर्वी नवरात्रीच्या दरम्यान एकमेकांना भेटले होते आणि नंतर ते एकमेकांच्या खूप जवळ आले. ऋतुराज आर्थिक संकटात होता म्हणून त्याने मुलीला लॉकर चोरण्यास तयार केलं. चोरी केल्यानंतर दोघांनी लॉकरमध्ये सापडलेल्या काही वस्तू वासना रिव्हरफ्रंटजवळील झुडुपात फेकून दिल्या. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरी