शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

५३ वर्षाच्या काकीचा २७ वर्षाच्या पुतण्यासोबत विवाह; हत्येनंतर पोलिसांनी पतीला केली अटक, आई फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 11:58 IST

माझगाव येथील ५३ वर्षीय महिलेच्या खूनाच्या प्रकरणात २७ वर्षीय पतीला आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

Mumbai Crime: माझगाव येथील ५३ वर्षीय महिलेच्या खूनाच्या प्रकरणात २७ वर्षीय पतीला पोलिसांनी अटक केली आहे. दोन महिन्यांपूर्वी ५३ वर्षीय गुलशन खान यांचा इमारतीमधून पडून मृत्यू झाला होता. त्यावेळी पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे समजून गुन्हा नोंदवला होता. मात्र न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून गुलशन खान यांची हत्या झाल्याचे उघड झालं. त्यानंतर खान यांच्या मृत्यूप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध अंतर्गत खुनाचे गुन्हे दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी खान यांचा पती शोएब इम्तियाज याला अटक केली. या प्रकरणात शोएबचा भाऊ जैद इम्तियाज हुसेन खान आणि आई रोशन खान या सहआरोपी असून ते फरार आहेत. पोलिसांना सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचा संशय होता, मात्र तपासात हत्येचा कट रचल्याचे समोर आलं.

मुख्य आरोपी, शोएब इम्तियाज खान उर्फ ​​बोबदा हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. शोएबने गुलशन खान यांच्याशी विवाह केला होता. शोएब हा त्यांचा पुतण्या होता. २०२२ मध्ये गुलशन आणि शोएब यांनी विवाह केला होता. त्यावेळी गुलशन या पहिल्या पतीच्या घरातून ६५ तोळे सोने घेऊन आल्या होत्या. ६ एप्रिल रोजी गुलशन यांचा भायखळा येथील मोंटे साउथ इमारतीच्या १३ व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर गुलशन यांचे पहिले पती हशमत खान यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी १६ एप्रिल रोजी शोहेब, त्याचा मोठा भाऊ आणि त्याची आई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ६३ वर्षीय लाकूड व्यापारी हशमत खान यांनी चार विवाह केले आहेत आणि गुलशन ही त्यांची दुसरी पत्नी होती.

हशमत खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुलशन या गेल्या सात वर्षांपासून पुतण्या शोहेबसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. जेव्हा हशमत यांना याबाबत कळले तेव्हा त्यांचा गुलशन यांच्यासोबत वाद झाला. त्यानंतर गुलशन डिसेंबर २०२२ पासून त्यांच्या मुलीसह शोहेबसोबत राहू लागल्या. "२ एप्रिल रोजी गुलशनने मला शोहेबसोबत राहण्याच्या निर्णयाबद्दल पश्चात्ताप झाला आहे आणि शोहेब, त्याचा भाऊ आणि त्याची आई पैशासाठी माझा छळ करत आहेत, मला आता जगायचे नाही असं सांगितले होते," असं हशमत खान म्हणाले.

दरम्यान, हशमत यांच्या म्हणण्यानुसार, ते गुलशन यांच्यावर रागावला होते, म्हणून त्यांनी त्ंयाच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. काही दिवसांनी गुलशन यांच्या आत्महत्येची बातमी मिळाली. घटनास्थळी पोलिसांना अनेक पुरावे सापडले होते ज्यामुळे शोहेबवर संशय निर्माण झाला होता. पोलिसांना रातील बाथरूमच्या दारावर आणि चप्पलवर रक्ताचे डाग आढळले होते. त्यामुळे पोलिसांनी ते हे पुरावे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले. अहवालामधून गुलशन यांची हत्या झाल्याचे समोर आलं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईMumbai policeमुंबई पोलीस