शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चेन स्नॅचर निघाला कंपनीचा एचआर! गर्लफ्रेंडवर खर्च करत होता पैसे, पोलीस पोहोचल्यावर बोलू लागला इंग्रजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 09:11 IST

पोलिसांच्या चौकशीत आरोपीने प्रेयसीला महागड्या भेटवस्तू देण्यासाठी चेन स्नॅचिंगसारख्या घटना घडवून आणल्याचे समोर आले आहे.

आग्रा : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) आग्रा पोलिसांनी (Agra police) चेन स्नॅचिंगच्या आरोपाखाली एका कंपनीच्या एचआरला अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने प्रेयसीला महागड्या भेटवस्तू देण्यासाठी चेन स्नॅचिंगसारख्या घटना घडवून आणल्याचे समोर आले आहे. अभिषेक ओझा असे आरोपीचे नाव आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी खूप शिकलेला आहे. तसेच, तो गुरुग्राममधील एका कंपनीत एचआर मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. हा आरोपी दुचाकीवरून चेन स्नॅचिंग करत होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांत आग्रामध्ये चेन स्नॅचिंगच्या घटना वाढल्या होत्या. गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिस रस्त्यांवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन करत होते. यामधील एका फुटेजमध्ये आरोपी दिसला होता.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपीच्या घरी पोहोचले, तेव्हा सुरुवातीला त्याने घटनेचा इन्कार केला. उलट पोलिस अधिकार्‍यांसमोर तो इंग्रजीत बोलत होता. मात्र, यानंतर पोलिसांनी आरोपीला सीसीटीव्ही फुटेज दाखवले असता त्याने स्नॅचिंगच्या घटनेची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे यापूर्वी कोणतेही गुन्हे नोंद नाहीत.

याचबरोबर, आरोपीने आग्रा पोलिसांना सांगितले की, कोरोनामुळे त्याचे काम अजूनही घरातून काम म्हणून सुरू आहे. कामातून मोकळा झाल्यावर तो बाईकवर आग्राच्या रस्त्यांवर फिरत होता आणि चेन स्नॅचिंग करत होता. तसेच, तो अनेकदा महिलांना टार्गेट करत होता. तो महिलांकडील दागिने हिसकावून सोनारांना विकत होता. या दागिन्यांसाठी तो सोनाराकडून भरमसाठ रक्कम घेत होता. 

आरोपींकडून जप्त केले पिस्तूल पोलिसांनी आरोपींकडून दुचाकी, सोनसाखळी, पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली आहेत. आरोपी लोकांना बंदुकीचा धाक दाखवून लुटत होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी हा उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. त्यांचा पगारही जवळपास 45000 रुपये आहे. आपल्या मैत्रिणीसाठी आणि मौजमजेसाठी तो चेन स्नॅचिंग करत होता.चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, 8 नोव्हेंबर 2022 रोजी त्याने आग्रा शहरातील एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लुटली होती. याशिवाय, चेन स्नॅचिंगच्या अनेक घटनांमध्येही आरोपीचा सहभाग होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश