शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

फ्रेन्डसोबत लिव्ह इनमध्ये राहत होती फूड ब्लॉगर रितिका, पतीने हात पाय बांधून चौथ्या मजल्यावरून फेकल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 13:53 IST

Agra Crime News : शुक्रवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारात फ्लॅटमध्ये तीन तरूण आणि दोन महिला आल्या होत्या. त्यानंतर अपार्टमेंटमधील काही लोकांना काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि बाहेर येऊन पाहिलं तर महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.

Agra Crime News : उत्तर प्रदेशच्या आग्रामधील  ओम श्री प्लॅटिनम अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या 30 वर्षीय फॅशन आणि फूड ब्लॉगर रितिका सिंहला हात पाय बांधून खाली फेकलं, ज्यामुळे जागीच तिचा मृत्यू झाला. मीडिया रिपोर्टनुसार, रितिका पती आकाश गौतमला सोडून गेल्या तीन वर्षांपासून फेसबुक फ्रेन्ड विपुल अग्रवालसोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. पोलिसांनी याप्रकरणी रितिकाचा पती आकाश गौतम आणि त्याच्यासोबत आलेल्या दोन महिलांसोबतच तिचा फेसबुक फ्रेन्ड विपुल यालाही ताब्यात घेतलं.

पोलिसांनी या घटनेची पूर्ण माहिती देताना सांगितलं की, ओम श्री प्लॅटिनम अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लोकांच्या सूचनेनंतर ताजगंज पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितलं की, मृत महिलेचं नाव रितिका आहे. जी विपुल अग्रवालसोबत लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. त्यांनी सांगितलं की, विपुलची पत्नीसोबत घटस्फोटाची केस सुरू आहे.

त्यांनी सांगितलं की, शुक्रवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारात फ्लॅटमध्ये तीन तरूण आणि दोन महिला आल्या होत्या. त्यानंतर अपार्टमेंटमधील काही लोकांना काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि बाहेर येऊन पाहिलं तर महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्यांनी लगेच पोलिसांना सूचना दिली.पोलिसांनी याप्रकरणात कथितपणे सहभागी दोन महिला सुनीता आणि सुशीलासोबत आकाश गौतमला ताब्यात घेतलं. पोलिसांनी सांगितलं की, यासोबतच विपुललाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. लोकांची चौकशी केली जात आहे.

मूळची गाजियाबादच्या विजय नगरची राहणारी रितिकाचं 2014 मध्ये आकाश गौतमसोबत लव्ह मॅरेज झालं होतं. लग्नानंतर दोघेही फिरोजाबादमध्ये राहत होते. इथे पती आकाश कोचिंग क्लासेस घेत होता. त्यानंतर ते आग्र्याला शिफ्ट झाले. दरम्यान 2017 मध्ये फेसबुकवर रितिकाची मैत्री अग्रवालसोबत झाली. विपुल आधीच विवाहित होता. आकाशला दोघांच्या नात्याचा संशय आला. ज्यावरून त्यांच्या भांडण होत होतं. यानंतर 2019 मध्ये रितिका पती आकाशला सोडून विपुलसोबत लिव इनमध्ये राहू लागली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश शुक्रवारी 11 वाजता दोन महिलांना सोबत घेऊन ओम श्री प्लॅटिनम अपार्टमेंटमध्ये आला आणि रितिकाने दरवाजा उघडताच तिला मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याने आपल्या मित्रांसोबत मिळून विपुलचे हाय पाय बांधून त्याला बाथरूममध्ये बंद केलं. पुन्हा रितिकाला मारहाण केली.

विपुलने पोलिसांना सांगितलं की, आकाश आणि त्याच्या काही साथीदारांनी रितिकाचे हात पाय बांधले आणि गळ्यात दोरी बांधून तिला बाल्कनीतून खाली फेकलं. विपुलनुसार, ते लोक त्यालाही मारणार होते. पण त्याने बाथरूमचा दरवाजा तोडून आरडाओरड सुरू केली होती. ज्यामुळे आजूबाजूचे लोक तिथे जमा झाले होते. त्यांना पाहून हे लोक पळू लागले होते. मात्र, लोकांनी आकाश आणि दोन महिलांना पकडलं.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी