शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अशी होती चोरीची पद्धत; वय 13 वर्षे, पगार 18 लाख, काम : लग्नात चोरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 09:29 IST

आई - वडिलांनीच ढकलले गुन्हेगारीच्या दलदलीत

बुंदी : गुन्हेगारीच्या दलदलीत आपल्या अल्पवयीन मुलाला त्याच्या आई - वडिलांनीच ढकलल्याचे एक धक्कादायक प्रकरण राजस्थानात घडले आहे. १३ वर्षे वयाचा मुलगा विवाह समारंभामध्ये वऱ्हाडी मंडळींच्या बॅगांची, त्यातील मौल्यवान ऐवज, दागदागिन्यांची चोरी करायचा. त्यापायी त्याला वर्षाला १८ लाख रुपये मिळायचे. या मुलाने महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, हरयाणा या राज्यांत अशा प्रकारच्या चोऱ्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.हा अल्पवयीन आरोपी मध्य प्रदेशचा मूळ रहिवासी असून, त्याचे इयत्ता तिसरीपर्यंत  शिक्षण झाले आहे. आतापर्यंत त्याने अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत. चोरीसाठी तो नेहमी प्रवास करायचा. त्यातून जसा वेळ मिळेल तसे आई-वडिलांना भेटायला यायचा. त्याच्या प्रवासाची, खाण्या - पिण्याची, कपडालत्त्याची सर्व जबाबदारी चोरांच्या टोळीने घेतली होती. 

लक्झरी कारने करायचा प्रवासn ज्या विवाह समारंभात चोरी करायची तिथे या अल्पवयीन चोराला लक्झरी गाडीतून नेले जात असे. त्याच्याकडे उत्तम कपड्यांचे दहा - बारा जोड होते. n एखाद्या ठिकाणी चोरी करताना घातलेले कपडे तो दुसऱ्या ठिकाणी वापरत नसे. हा मुलगा व त्याचे साथीदार कोणत्याही हॉटेलमध्ये उतरत नसत. n ते आपल्या गाडीतच झोप घेत. राजस्थानातील बुंदी येथे या मुलाने एका विवाह समारंभातून १७ लाखांच्या दागिन्यांची चोरी केली होती. मात्र, ९ फेब्रुवारी रोजी बुंदी येथेच चोरी करताना वऱ्हाडी मंडळींनी या मुलाला पक़डले.

...अशी होती चोरी करण्याची पद्धत

चोरांच्या टोळीचा प्रमुख कुठे चोरी करायची हे ठिकाण निश्चित करत असे. त्यानंतर हा मुलगा एखाद्या विवाह समारंभामध्ये वऱ्हाडी मंडळींच्या बॅगांची नीट माहिती काढत असे. त्यातील रोख रक्कम, दाग-दागिने असलेली बॅग उचलून पसार होत असे. हे दागिने तो आपल्या टोळीकडे देत असे. मग ते त्या मौल्यवान ऐवजाची विल्हेवाट लावत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्न