शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

बंगालमधील आरजी कारनंतर आता हावडा जिल्हा रुग्णालय...! अप्लवयीन मुलीचं लैंगिक शोषण, टेक्निशियनचं किळसवाणं कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 14:57 IST

याप्रकरणी आरोपीला अटकही करण्यात आली आहे...

सरकारी आरजी कर रुग्णालयातील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरी अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर पश्चिम बंगालसह संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. पश्चिम बंगालमधील महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात विरोधकांकडून ममता सरकारला लक्ष्य केले जात आहे. या मुद्द्यावरून भाजप ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. यातच आता, हावडा जिल्हा रुग्णालयात एका अल्पवयून मुलीचे लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपीला अटकही करण्यात आली आहे.

हावड जिल्हा रुग्णालयात अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण -गेल्या 28 ऑगस्तला एका 12 वर्षांच्या मुलीला छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पीडितेला शनिवारी (31 ऑगस्ट) सीटी-स्कॅनसाठी घेऊन जात असताना एका टेक्निशियनने तिच्यासोबत गैरवर्तन केले. प्रकरणाची माहिती मिळताच हावडा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान पोलिसांनी एका आरोपीला अटकही केली आहे.पश्चिम बंगालच्या परगना येथील मध्यमग्राममध्येही अल्पवयीन मुलीचा विनयभंग - याशिवाय, पश्चिम बंगालच्या परगना येथील मध्यमग्राममध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. यानंतर येथील संतप्त जमावाने आरोपीच्या घराची आणि त्याच्या नातेवाईकाच्या दुकानाची तोडफोड केली. यावेळी जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

अमित मालवीय यांची उपस्थित केला सवाल -भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी पश्चिम बंगालमधील महिलांवरील अत्याचारावरून ममता सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, "पश्चिम बंगालमध्ये सप्टेंबर 2024 च्या पहिल्याच दिवशी लैंगिक अत्याचाराच्या चार नव्या प्रकरणांची नोंद झाली. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री असताना पश्चिम बंगाल हे महिलांसाठी सर्वात असुरक्षित राज्य आहे. त्यांनी बलात्कार आणि पॉक्सो प्रकरणातील आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी कठोर नियमांची अंमलबजावणी आणि  जलदगती न्यायालये स्थापन करण्यासाठी कोणतेही काम केलेले नाही. त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणhospitalहॉस्पिटलwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जी