शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

'लग्न लावून द्या नाही तर व्हिडीओ लीक करतो'...होणाऱ्या नवरदेवाने नवरीच्या आईला दिली धमकी आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 14:45 IST

Bihar Crime News : तीन महिने उलटल्यानंतर तरूणीच्या कुटुंबियांनी होणाऱ्या नवरदेवाचं वागणं-राहणीमान बघता लग्न करण्यास नकार दिला. यामुळे तरूण संतापला.

Bihar Crime News : बिहारच्या बगहामध्ये लग्न कॅन्सल झालं म्हणून एका तरूणाने असं काही केलं ज्यामुळे त्याला तुरूंगाची हवा खाली लागणार आहे. बगहाच्या एका गावातील तरूणीचं लग्न यूपीमध्ये ठरलं होतं. तीन महिने उलटल्यानंतर तरूणीच्या कुटुंबियांनी होणाऱ्या नवरदेवाचं वागणं-राहणीमान बघता लग्न करण्यास नकार दिला. यामुळे तरूण संतापला.तरूणाने तरूणीच्या आईला तरूणीने काही अश्लील व्हिडीओ आणि फोटो पाठवले. मग धमकी देत म्हणाला की, जर त्याचं तरूणीसोबत लग्न लावून दिलं नाही तर तो व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल. यानंतर तरूणीची आई पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तिने आरोपीसहीत चार लोकांविरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसात दिलेल्या तक्रारीत तरूणीच्या आईने सांगितलं की, गावातील आपल्या नातेवाईकच्या मुलासोबत लग्न करण्यासाठी तरूणीच्या कुटुंबियांना तयार करण्यात आलं. सुमित्रा देवीच्या सांगण्यावरून यूपीच्या घुघलीमधील नारायणपूर येथील चंदेश्वर तिवारीसोबत तरूणीचं लग्न ठरवण्यात आलं. लग्न ठरवणारी सुमित्रा देवीने नवरदेवाला नवरीचा मोबाइल नंबर मिळवून दिला. दोघे फोनवर बोलू लागले होते आणि मग नंतर नवरदेव तरूणीवर प्रेशर टाकून तिचे अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड करू लागला होता. यादरम्यान त्याने तरूणीने अनेक व्हिडीओ रेकॉर्ड केले.

जेव्हा तरूणीच्या कुटुंबियांना समजलं की, तरूणाचं राहणं-वागणं चांगलं नाहीये. तर त्यांनी लग्न मोडलं. त्यानंतर संतापलेल्या नवरदेवाने तरूणीच्या आईला तरूणीचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो पाठवून धमकी दिली. त्यावरून तो तरूणीसोबत लग्न करण्यासाठी दबाव टाकू लागला होता.

पीडितेच्या आईने सांगितलं की, १९ एप्रिलला सुमित्रा देवीच्या घरी चंदेश्वर चौधरी, रमेश चौधरी आणि धीरेंद्र चौधरी आले. ते तरूणीला फसवून बगहा बाजारात घेऊन गेले. तिथे त्यांनी तिला व्हिडीओ दाखवले आणि धमकी देत लग्न करण्यास सांगितलं.

महिला पोलीस स्टेशनच्या SHO धर्मवीर भारती यांनी सांगितलं की, चार लोकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल. सध्या चौकशी सुरू आहे. आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल. 

टॅग्स :BiharबिहारUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी