शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

ब्रेकअप के बाद, अशी ही लव्हस्टोरी; प्रियकर म्हणे तुला जिवंत नाही सोडणार पोरी

By भूषण.विजय.रामराजे | Updated: May 14, 2023 16:08 IST

या ब्रेकअपमुळे सैरभैर झालेला राजेंद्र सातत्याने युवतीचा पाठलाग करून तिची मनधरणी अथवा भांडण करत होता

नंदुरबार : प्रेमसंबंधाचे ब्रेक अप झाल्यानंतर संतप्त झालेल्या माजी प्रियकराने भावासोबत घरी जाणाऱ्या मुलीला रस्त्यात गाठून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आड आलेल्या भावाने विरोध केल्यानंतर त्याला मारहाण करत, मुलीला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचा प्रकार नंदुरबार शहरात घडला आहे. याप्रकरणी १९ वर्षीय युवतीने फिर्याद दिली आहे. नंदुरबार तालुक्यातून शिक्षणासाठी येणाऱ्या १९ वर्षीय तरुणीचे नांदरखेडा येथील राजेंद्र सुरेश सूर्यवंशी (२४) या युवकासोबत प्रेमसंबध होते; परंतु कालांतराने दोघांच्यात ‘ब्रेक अप’ झाला होता. 

या ब्रेकअपमुळे सैरभैर झालेला राजेंद्र सातत्याने युवतीचा पाठलाग करून तिची मनधरणी अथवा भांडण करत होता. १२ मे रोजी युवती दुपारी शहरातील दुधाळे शिवारातील हस्तीनगरातून भावासह मोटारसायकलीने आपल्या गावाकडे जात असताना एका ठिकाणी राजेंद्र व त्याच्या मित्राने दोघांना गाठून थांबवले होते. दरम्यान राजेंद्र याने युवतीसोबत वादही घातला होता. यावेळी तिने दाद न दिल्याने तिला मोटारसायकलीवर बसवून घेऊन जाण्याचा प्रयत्न राजेंद्र आणि त्याच्या मित्राने केला होता. दरम्यान दोघांना विरोध करणाऱ्या युवतीच्या भावालाही दाेघांनी मारहाण केली होती. प्रसंगी परिसरातील नागरिक जमा झाल्याने दोघांनी पळ काढला होता. यातही जाता-जाता युवतीला उचलून घेऊन जाईल, कुटुंबाला संपवून टाकेल, अशी धमकी दिली होती. यातून घाबरलेल्या युवतीने तात्काळ नंदुरबार शहर पोलिस ठाणे गाठले होते. याप्रकरणी १९ वर्षीय युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित राजेंद्र सुरेश सूर्यवंशी, रा. नांदरखेडा, ता. नंदुरबार (२४) आणि त्याचा अनोळखी मित्र अशा दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक संपत वसावे करत आहेत.

टॅग्स :nandurbar-acनंदुरबारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस