शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणानंतर चाकूच्या धाकावर धावत्या कारमध्ये मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 23:10 IST

ओळखीतील एका युवकाला झोपेतून उठवून सिगारेट पिण्याच्या बहाण्याने नेऊन त्याचे अपहरण केले. यानंतर तिघांच्या मदतीने चाकूचा धाक दाखवून धावत्या कारमध्ये त्याला अमरावतीहून नांदेडपर्यंत मारहाण करण्यात आली.

अमरावती - ओळखीतील एका युवकाला झोपेतून उठवून सिगारेट पिण्याच्या बहाण्याने नेऊन त्याचे अपहरण केले. यानंतर तिघांच्या मदतीने चाकूचा धाक दाखवून धावत्या कारमध्ये त्याला अमरावतीहून नांदेडपर्यंत मारहाण करण्यात आली. त्याचे मुंडण करण्याचा व्हिडीओ काढण्यात आला. ही धक्कादायक घटना परिगणित कॉलनीत रविवारी पहाटे ५.३० च्या सुमारास घडली. 

महेश वानखडे, गोविंद, शंकर, गणेश (सर्व रा. नमस्कार चौक, नांदेड) अशी आरोपींची नावे आहेत. गजानन सुभाषराव चौके (२३, रा. टाकळी जहागीर ह.मु. परिगणित कॉलनी) याने याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांत तक्रार नोंदविली. तक्रारीनुसार, तो व आतेभाऊ महेंद्र मुंडाले हे सात वर्षांपासून परिगणित कॉलनीत भाड्याने राहतात. त्याच्या घरमालकाच्या मुलीचे लग्न जुलै २०२० मध्ये महेश वानखडेशी झाले आहे. त्यामुळे महेशची गजाननशी ओळख झाली. रविवारी गजानन झोपला असता, आतेभावाने त्याला उठविले व महेश आल्याचे सांगितले.  महेशने चहा व सिगारेटच्या बहाण्याने खाली नेले व कारमध्ये बसण्यास सांगितले. त्यात आधीच तिघे होते. शहराबाहेर लोणीजवळ कार येताच महेशच्या इशाºयावर शंकरने फिर्यादीस चाकू दाखविले व एका महिलेसोबत असलेले संबंध तोड, असे म्हणून शिवीगाळ केली. सर्वांनी त्याला  धावत्या कारमध्ये थापडाबुक्क््यांनी मारहाण केली. त्याचे मुंडण करून   व्हिडीओ तयार करण्यात आला. मारहाण करीत नांदेडला नेले तसेच  त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. त्याला नांदेड येथील नमस्कार चौकात सोडून दिली. आरोपीच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर गजाननने आतेभावाच्या मदतीने अमरावती गाठून ठाण्यात सोमवारी तक्रार नोंदविली. आरोपींविरुद्ध कलम ३६३, ३२३, ५०४, ५०६ (ब) अन्वये गुन्हा नोंदविला.

युवकाचे अपहरण करून कारमध्ये मारहाण केल्याची तक्रार आहे तसेच त्याचे मुंडणही करण्यात आले. तक्रारीवरून  चार आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. तपास सुरू आहे. - पुंडलिक मेश्राम, वरीष्ठ पोलीस निरीक्षक  फ्रेजरपुरा, अमरावती

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती