After 4 hours of interrogation, comedian Bharati was handcuffed by NCB and both confessed to taking drugs. | ४ तासांच्या चौकशीनंतर कॉमेडियन भारतीला NCBने ठोकल्या बेड्या, दोघांनीही ड्रग्ज सेवन करत असल्याचे केले कबूल 

४ तासांच्या चौकशीनंतर कॉमेडियन भारतीला NCBने ठोकल्या बेड्या, दोघांनीही ड्रग्ज सेवन करत असल्याचे केले कबूल 

ठळक मुद्देया चौकशीत भारती आणि तिचा पती हर्ष यांनी गांजा सेवनाबाबत कबुली दिली. त्यानंतर भारतीला एनसीबीने अटक केली. तर हर्षची एनसीबी चौकशी करत असून तो रडारवर आहे. 

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात कॉमेडियन भारती सिंगच्या मुंबईच्या घरी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) छापा टाकला आहे आणि धक्कादायक म्हणजे तिच्या घरात ८६.५ ग्राम गांजा सापडला आहे. एनसीबीच्या मुंबई झोनल युनिटने कॉमेडियन अभिनेत्री भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांच्या घरी छापा टाकत दोघांना ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केली. या चौकशीत भारती आणि तिचा पती हर्ष यांनी गांजा सेवनाबाबत कबुली दिली. त्यानंतर भारतीला एनसीबीने अटक केली तर हर्षला देखील एनसीबीने चौकशीनंतर अटक केली आहे. 

एनसीबी अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा भागात छापे टाकत आहे. तसेच भारती आणि हर्ष या दोघांना समन्स बजावण्यात आले होते. अटकेत असलेल्या एका ड्रग्स पेडलरकडून मिळालेल्या माहितीनुसार भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाच्या घरी छापा टाकण्यात आला. छाप्यादरम्यान एनसीबीला एक संशयास्पद अमली पदार्थ (गांजा) सापडला आहे. बॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत बऱ्याच सेलिब्रेटींची नाव समोर आली आहेत. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीपासून दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यापासून ते अर्जून रामपालपर्यंत अनेकांची चौकशी झाली. अजूनही एनसीबीची ही करावाई सुरु आहे.   

 

Read in English

Web Title: After 4 hours of interrogation, comedian Bharati was handcuffed by NCB and both confessed to taking drugs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.