शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

२३ दिवसांनी श्वानांमुळे उलगडलं महिलेच्या हत्येचं रहस्य; पतीसह ४ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 15:34 IST

जोगेंद्रचे कुटुंबीयांतील एका महिलेशी अवैध संबंध असल्याचा सरिताला संशय असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

नवी दिल्ली - अनैतिक संबंधांना विरोध केल्यानं पती आणि सासरच्यांनी मिळून सरिताची हत्या करून तिचा मृतदेह जमिनीत गाडून टाकला. ८ मार्च रोजी ही घटना घडली परंतु २३ दिवसांनंतर शुक्रवारी कुत्र्यांनी दुर्गंधी येत असल्याने जमिनीची माती बाहेर काढली तेव्हा हा खून उघडकीस आला. सरिताला आपल्या पतीचे कुटुंबातील एका महिलेसोबत अवैध संबंध असल्याचा संशय होता असं पोलिसांना प्राथमिक माहिती मिळाली. 

पतीच्या या कृत्याला तिचा विरोध असायचा, या गोष्टीवरून अनेकदा तिचं पतीशी भांडण व्हायचे. या प्रकरणी पोलिसांनी सरिताचा पती जोगेंद्र उर्फ ​​लाला, सासू संता आणि वहिनी उषा यांना अटक केली आहे. तर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. ग्रेनो वेस्टमधील तुस्याना गावात राहणाऱ्या हरिओमची मुलगी सरिता हिचा विवाह डेरी कंबक्सपूर गावातील रहिवासी जोगेंद्रसोबत १६ फेब्रुवारी २०१५ रोजी झाला होता. सरिता ८ मार्च रोजी बेपत्ता झाली होती. ९ मार्च रोजी जोगिंदरने नॉलेज पार्क पोलिस ठाण्यात पत्नी सरिता बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीची नोंद करून तपास सुरू केला.

दुसरीकडे सरिताचा भाऊ नरेंद्र याच्या फिर्यादीवरून १५ मार्च रोजी पती जोगेंद्र, सासू सांता, दीर भूपेंद्र, वहिनी उषा, चुलत सासरे विजयपाल आणि इतर यांच्याविरुद्ध हुंड्यासाठी छळ आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जोगेंद्रचे कुटुंबीयांतील एका महिलेशी अवैध संबंध असल्याचा सरिताला संशय असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पतीला तिचा विरोध होता. यावरून अनेकदा वादही झाले. मध्यरात्री जोगेंद्रने सरिताचा गळा आवळून खून केल्याचे आरोपींनी पोलिसांना कबुली दिली. जोगेंद्रसह भाऊ भूपेंद्र, वहिनी उषा आणि आई सांता यांनी त्याचा मृतदेह लपवला.

१२ मार्च २०२१ रोजी जेव्हा सरिताने पतीच्या अवैध संबंधांना विरोध केला तेव्हा तिच्यावर हल्ला करण्यात आला. याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी एनसीआरची नोंद केली होती. आरोपींनी फावड्याने खड्डा खोदून मृतदेह जमिनीत पुरला होता. हा फावडा पोलिसांनी जप्त केला आहे. 

मृतदेह लपवून पोलीस आणि ग्रामस्थांची दिशाभूलसरिताचा मृतदेह जमिनीत गाडल्यानंतर  आरोपी बेधडकपणे त्यांच्या घरीच राहिले. आरोपी जोगेंद्रने दुसऱ्या दिवशी बेपत्ता व्यक्तीची नोंद करण्यासाठी पोलिस स्टेशन गाठले. सरिता मोबाईलवर कोणाशी तरी बोलत असे, असे सांगून आरोपी पोलिस व गावकऱ्यांची दिशाभूल करत होता. ती त्याच्यासोबत गेली असावी. आरोपींनी सरितावर खोटे आरोप करण्यास सुरुवात केली. मातृपक्षाचा अहवाल नोंदवूनही पोलिसांनी आरोपींची अनेकवेळा चौकशी केली मात्र आरोपी खोटे बोलतच होते.

हत्येनंतर महिलेवरच प्रश्न उपस्थितआरोपी सासरच्या लोकांनी सरिताच्या हत्येनंतर तिच्या चारित्र्यावर बोट दाखविल्याचा आरोप आहे. आरोपी गावातील लोकांना ती कुणासोबत पळून गेल्याचं सांगत होते. माहेरच्यांनी याचा खुलासा करण्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याकडे मोबाईलचा सीडीआर वगैरे तपासण्याबाबतही बोलले. 

याप्रकरणी महिलेच्या हरवल्याची नोंद यापूर्वी करण्यात आली होती. त्यानंतर अपहरण आणि हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर आता खून आणि मृतदेह लपवून ठेवण्याच्या कलमात वाढ करण्यात येणार आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. - अशोक कुमार, एडीसीपी ग्रेटर नोएडा

टॅग्स :Policeपोलिस