शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

Shraddha Walker Murder Case: पैसे ट्रान्सफर, इन्स्टाग्राम चॅट अन् चुकीची तारीख; श्रद्धाच्या मृत्यूबाबत कसं उलघडलं गूढ?, पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 12:02 PM

Shraddha Walker Murder Case: आफताबने सुरुवातील मुंबई आणि दिल्लीतील पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.

Shraddha Walker Murder Case: संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा हत्याकांड प्रकरणी एकामागून एक नवीन खुलासे होत आहेत. हत्या करणारा आरोपी आफताब अमीन पूनावालाची (Aftab Poonawalla) क्रूरता पाहून सर्वांनाच हादरवून सोडले आहे. मात्र सदर प्रकरण नेमकं कसं उलघडलं याची माहिती समोर आली आहे.

आफताबने सुरुवातील मुंबई आणि दिल्लीतीलपोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. पोलिसांनी सांगितले की, आम्ही चौकशी सुरु केली असता आफताब खोटं बोलत होता. तसेच श्रद्धा २२ मे रोजी भांडण झाल्यामुळे घर सोडून निघून गेली होती. घर सोडत असताना श्रद्धाने सोबत फक्त तिचा मोबाईल घेतला होता. बाकीचं सर्व सामान तिने माझ्याकडे ठेवलं होतं, असं आफताबने पोलिसांनी सांगितलं. मात्र पोलिसांनी श्रद्धा आणि आफतबचे कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर अनेक महत्वाचे धागेदोरे समोर आले. 

'दररोज नवीन अनुभव...'; श्रद्धाची 'ती' पोस्ट ठरली अखेरची, दोघंही गेलेले हिमाचल प्रदेशात!

पोलिसांच्या तपासात एक महत्वाची माहिती हाती लागली. आफताब २२ मेनंतर श्रद्धाच्या संपर्कात नसल्याचं सांगत होता. मात्र यात २६ मे रोजी श्रद्धाच्या नेट बँकिंग अकाऊंट अॅपवरुन आफताबच्या अकाऊंटवर ५४ हजार रुपयांचं ट्रान्झेक्शन झालं होतं. तसेच श्रद्धा घर सोडताना मोबाईल घेऊन गेली होती, अशी माहिती आफताबने दिली. मात्र श्रद्धाच्या फोनचं लोकेशन आफताबच्या घराजवळच दाखवत होतं. ३१ मे रोजी श्रद्धाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिच्या मित्रासोबत चॅटिंग केली होती. त्या दिवसाचं लोकेशन देखील आफताबच्या घराजवळीलचं होतं. त्यामुळे पोलिसांचा आफताबवरील संशय वाढला आणि त्याची चौकशी सुरु झाली. या चौकशीत आफताबने श्रद्धाची हत्या केल्याचं मान्य केलं.

दरम्यान, श्रद्धा आणि आफताबची एका डेटिंग अॅपवर ओळख झाली होती. त्यानंतर दोघेही लिव्ह इन-रिलेशनमध्ये राहू लागले. दोघंही वसई येथील रहिवाशी असल्याने त्यांचं जास्त जुळून आलं. दोघंही जास्त जवळीक येण्याचं हेच एक कारण ठरल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच लग्नाच्या बहाण्यानं श्रद्धाला आफताब दिल्लीत घेऊन गेला होता. अनेक दिवस उलटल्यानंतर श्रद्धाने लग्नासाठी तगादा लावल्यामुळे आपण कंटाळून तिची हत्या केल्याची कबूली दिली आहे. तसेच तिचे ३५ तुकडे करुन, दिल्लीच्या परिसरात फेकल्याची माहितीही त्याने दिली आहे. 

दोघांमधील ते एक साम्य ठरलं घातक; श्रद्धा अन् आफताबची नेमकी जवळीक का झाली?, पाहा

श्रद्धाच्या मृतदेहाचे १२ तुकडे सापडले 

श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधता यावेत, यासाठी दिल्ली पोलिसांनी आफताबला मंगळवारी मेहरौलीच्या जंगलात नेले होते. पोलिसांना आतापर्यंत १२ तुकडे मिळाले आहेत. फॉरेन्सिक तपासणीनंतरच हे तुकडे श्रद्धाचे आहेत, की नाही याची पुष्टी होईल. गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेला चाकूही जप्त केला आहे. 

दोन स्टेटमेंटमध्ये तफावत-

आफताब आणि त्याच्या आईला माणिकपूर पोलिसांनी श्रद्धाच्या गायबप्रकरणी पोलिस ठाण्यात ३ नोव्हेंबरला बोलावले होते. आरोपी आफताब याचे ३ नोव्हेंबर आणि त्याआधी दोन वेळा स्टेटमेंट घेतले. पण दोन्ही स्टेटमेंटमध्ये तफावत आढळल्याने माणिकपूर पोलिसांना संशय आल्याने ७ नोव्हेंबरला दिल्लीला गेले होते. 

 

 

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरPoliceपोलिसdelhiदिल्ली