शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मीट कापायच्या सुऱ्यानं केले श्रद्धाचे 35 तुकडे, आफताबने 'हा' शो पाहून बनवला थरकाप उडवणारा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 19:37 IST

आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून ते फ्रिजमध्ये ठेवले होते. तो रोज रात्री 2 वाजताच्या सुमारास तिच्या शरिराचे दोन तुकडे मेहरौलीच्या जंगलात फेकण्यासाठी जात असत...

श्रद्धा मर्डर केसने सध्या संपूर्ण देश हादरला आहे. लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाची हत्या करणाऱ्या आफताब अमीन पूनावालाने, या घटनेची संपूर्ण तयारी केली होती. तो ज्या श्रद्धासोबत प्रेमाचे नाटक करत होता, तिचीच त्याने एवढ्या भीषण पद्धतीने हत्या केली की, संपूर्ण घटना जाणून तुमचाही थरकाप उडेल...

मुंबईहून छत्रपूरला येऊन राहू लागलेल्या आफताबने लिव्ह इन पार्टनर श्रद्धाच्या लग्न करण्याच्या मागणीनंतर, हा कट रचला होता. एवढेच नाही, तर श्रद्धाचा मृतदेह लपविण्यासाठी त्याने 300 लिटरचे फ्रीजदेखील विकत आणले होते. तसेच, तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर त्याची दुर्गंधी पसरू नये,  म्हणून तो उदबत्याही लावत होता. महत्वाची गोष्ट म्हणजे, त्याने या घृणास्पद घटनेचा कट एक अमेरिकन क्राईम शो 'Dexter' पाहून रचला होता.

श्रद्धाने आई-वडिलांच्या विरोधात जाऊन नाते सुरूच ठेवले होते -पोलिसांनी आफताब अमीन पूनावालाला शनिवारी अटक केली आहे. आता त्याला 5 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. 26 वर्षीय श्रद्धा वालकरने तिच्या आई-वडिलांच्या विरोधात जाऊन आफताबसोबत आपले नाते सुरूच ठेवले होते. यामुळेच तीचे आई-वडिलांशी बोलणे होत नव्हते. अफताब आणि श्रद्धा हे दोघेही मुंबईहून दिल्लीला आले होते. फूड ब्लॉगर राहिलेल्या आफतासोबत श्रद्धाची मैत्री एका कॉल सेंटरमध्ये नोकरीदरम्यान झाली होती. दिल्लीत आल्यानंतरही श्रद्धा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असायची. यामुळे तिच्या घरच्यांना तिच्या संदर्भात माहिती मिळत होती. मात्र, 5 महिन्यांपासून मुलीसंदर्भात कसल्याही प्रकारचे अपडेट न मिळाल्याने तिच्या वडिलांनी दिल्लीत येऊन पोलिसांशी संपर्क साधला.

रोज दोन तुकडे फेकण्यासाठी जंगलात जायचा -पोलीस तपासात जे काही समोर आले आहे, ते समजल्यानंतर कुणाचाही थरकाप उडेल, कुणालाही धक्का बसेल. आफताबने 18 मे रोजीच श्रद्धाची हत्या केली होती. त्याने तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून ते फ्रिजमध्ये ठेवले होते. तो रोज रात्री 2 वाजताच्या सुमारास तिच्या शरिराचे दोन तुकडे मेहरौलीच्या जंगलात फेकण्यासाठी जात असत. अफताबने या हत्येचा कट अमेरिकन क्राइम शो Dexter पाहून रचला होता, असे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. आफताबने शेफ म्हणून ट्रेनिंग घेतली होती आणि मीट कापायच्या चाकूनेच त्याने आपल्या प्रेयसीचे तुकडे केले. दक्षिण दिल्ली पोलीस इंचार्ज अंकित चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांमध्ये लग्नासंदर्भात अनेक वेळा भांडण झाले होते. हा वाद वाढल्यानंतरच त्याने चाकूने श्रद्धाचे तुकडे केल.

वडिलांना कसा आला संशय - जेव्हा मुलीच्या एका मित्राने सांगितले, की श्रद्धाचा फोन गेल्या काही आठवड्यांपासून बंद आहे. तेव्हा तिच्या वडिलांना काही तरी अघटित घडल्याचा संशय आला.  यानंतर श्रद्धाच्या वडिलांनी थेट दिल्ली गाठली आणि मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तपास केल्यानंतर, आफताब पकडला गेला. यानंतर, आता जंगलात श्रद्धाच्या मृतदेहाचे काही तुकडेही सापडले आहेत. मात्र, आफताबने ज्या चाकूच्या सहाय्याने श्रद्धाची हत्या केली, तो अद्याप मिळू शकलेला नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMumbaiमुंबईLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट