शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनाधीन मुलाने आजारी वडिलांना जाळले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 23:42 IST

याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी १७ जुलै रोजी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी मुलाला अटक केली.

बाळापूर (जि.अकोला): दारूचे व्यसन असलेल्या मुलाने आजारी वडिलांना घरातच जिवंतपणे जाळल्याची घटना बाळापूर येथील लोटणापूर भागात १४ जुलै रोजी घडली. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी १७ जुलै रोजी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी मुलाला अटक केली.

लोटणापूरमध्ये धनेगाव येथील अजाबराव बापूसा इंगळे (५५) हे पत्नी व तीन मुलांसह मोलमजुरी करून भाड्याच्या खोलीत राहतात. काही दिवसांपूर्वी अजाबराव यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे ते खाटेवर पडून होते. दरम्यान, १४ जुलै रोजी दुपारी २:३० वाजताच्या दरम्यान दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा आकाश अजाबराव इंगळे (३०) हा घरात दारू पिऊन आला व त्याची आजारी वडिलांशी बोलचाल झाली. 

वाद वाढत गेला व रागाच्या भरात घरातील पेटलेल्या चुलीतील अग्नीने आजारी वडिलांच्या खाटेला खालून आग लावून तो घरातून निघून गेला. खाटेवरील कपड्यांमुळे आग भडकली. वृद्धाला अर्धांगवायूमुळे शरीराची हालचाल करता आली नाही. या आगीत ते गंभीररित्या भाजल्या गेलेत. यावेळी घरात कुणीच नसल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही. त्यांना उपचारार्थ अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तपास बाळापूर पोलिसांकडे वर्ग होताच खुनाचा उलगडा झालावृद्धाच्या मृत्यूनंतर अकोला येथे कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली व तपास बाळापूर पोलिसांकडे वर्ग केला होता. बाळापूर पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा व तिन्ही मुलांची कसून चौकशी केली. यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा आकाश याच्याविरुद्ध त्याचाच लहान भाऊ गौरव अजाबराव इंगळे (२४) याने फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आकाश याला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार अनिल जुमळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक पंकज कांबळे, अक्षय देशमुख करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी