शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

नागपुरात व्यसनाधिन नव-याची हत्या : हातोड्याने केला प्रहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 21:24 IST

पत्नी आणि तरुण मुलाला वा-यावर सोडून बाहेरख्यालीपणा करीत फिरणा-या दारूड्या नव-याला त्याच्याच पत्नीने हातोड्याचा प्रहार करून ठार मारले. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास ही थरारक घटना घडली.

ठळक मुद्देअजनीत घडला थरार : आरोपी महिला गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पत्नी आणि तरुण मुलाला वा-यावर सोडून बाहेरख्यालीपणा करीत फिरणा-या दारूड्या नव-याला त्याच्याच पत्नीने हातोड्याचा प्रहार करून ठार मारले. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. महेश पोरंडवार (वय ४४) असे मृताचे नाव असून, पोलिसांनी त्याची आरोपी पत्नी ममता महेश पोरंडवार (वय ४१) हिला अटक केली आहे.जयवंत नगरात ममता महेश पोरंडवारचे निवासस्थान आहे. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलीचे लग्न झाले असून, मुलगा (वय २१) बीसीएला शिकतो. पोरंडवार कुटुंबीयांची आर्थिक स्थिती तीन वर्षांपूर्वी चांगली होती. त्यांच्याकडे एक ट्रक, छोटा हाती आणि कारही होती. तीन प्लॉटही असल्याचे सांगितले जाते. काही वर्षांपूर्वी पोरंडवारला बाहेरख्यालीपणा आणि दारूचे व्यसन जडले. तेव्हापासून तो सर्व कमाई बाहेर उडवू लागला. आधी ट्रक, नंतर छोटे वाहन आणि कारही विकली. ही सर्व रक्कम त्याने बाहेर महिला आणि दारूमध्ये उडविली. त्याला विरोध केल्यास तो पत्नी आणि मुलाला मारहाण करायचा. त्याच्या बाहेरच्या शौकामुळे घरची आर्थिक स्थिती पूर्ण बिघडली. पत्नी ममता आणि विवाहित मुलगी तसेच नातेवाईक त्याची समजूत काढायचे. मात्र, तो त्यांनाच शिवीगाळ करून वाद घालायचा. गेल्या सात महिन्यांपासून तो अजनीत दुसरीकडे स्वतंत्र खोली करून एकटा राहू लागला. त्याने पत्नी आणि मुलाला अक्षरश: वा-यावर सोडले. बाहेर मौजमस्ती करून नोटा उधळणारा महेश पोरंडवार पत्नी आणि मुलाला खर्चासाठी अथवा शिक्षणासाठी दमडीही देत नव्हता. त्यामुळे उदरभरण करण्यासाठी ममता रुग्णांची केअरटेकर म्हणून खामल्यात काम करू लागली तर मुलगा शिकता शिकताच छोटे मोठे काम करत होता. ईकडे १५ ते २० लाखांचा एक प्लॉट पाच ते सात लाखांत विकण्याची तयारी महेशने चालविली होती. हे कळाल्यामुळे पत्नी, मुलगी आणि अन्य नातेवाईकांनी तो प्लॉट विकण्यास महेशला मनाई केली. त्यावरून महेश पत्नी ममता आणि विवाहित मुलीला घाणेरड्या भाषेत शिव्या देत होता.मारायलाही धावायचा. हा सर्व प्रकार सुरू असतानाच मुलाची कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे हवे म्हणून ममता गेल्या एक आठवड्यापासून महेशला वारंवार फोन करीत होती.तो पैसे देतच नव्हता. उलट घाणेरड्या शिव्या द्यायचा. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी ममता महेशच्या रूमवर गेली. तो दारूच्या नशेत टून्न होता. ममताने पतीलाकिमान मुलाच्या कॉलेजची फी तर द्या, अशी विणवनी केली. महेशने तिला पैसे देण्याऐवजी घाणेरड्या शिव्या देऊन मारहाण केली. पती-पत्नीमधील वाद वाढला. रागाच्या भरात ममताने बाजुला पडलेली हातोडी उचलली आणि महेश पोरंडवारच्या डोक्यात हाणली. त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.पोलीसही हादरले !हातोडी डोक्यावर बसल्याने रक्ताची चिरकांडी उडून तो खाली पडला. ते पाहून ममताने त्याला पाणी पाजून सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, दारूच्या नशेत आधीच टून्न असलेला महेश पोरंडवार कसलीही हालचाल करत नव्हता. त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्याने ममता तेथून निघाली. तिने तडक अजनी पोलीस स्टेशन गाठले. आपल्या हातून पतीची हत्या झाल्याचे तिने पोलिसांना सांगितले. तिच्या कपड्यावर, तोंडावर रक्त उडाल्याचे पाहून काही वेळेसाठी पोलीसही हादरले. ठाणेदार संतोष खांडेकर यांच्यासह एपीआय डेहनकर, पीएसआय जाधव यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी धावला. त्यांनी पोरंडवारचा मृतदेह मेडिकलला पाठविला.परिसरात हळहळपावसाळी वातावरण आणि गारठून ठाकणा-या थंडीत ही थरारक घटना घडल्याचे कळाल्याने परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. नागरिकांनी मोठ्या संख्येने तेथे गर्दी केली. दरम्यान, पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी ममताला अटक केली. एक सधन कुटुंबं अशा पद्धतीने उध्वस्त झाल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनnagpurनागपूर