अभिनेत्रीचे मित्रासोबतचे खासगी फोटो केले व्हायरल, कास्टिंग डायरेक्टरला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 03:22 AM2020-03-17T03:22:39+5:302020-03-17T03:23:29+5:30

पैशांच्या वादात एका अभिनेत्रीचे तिच्या मित्रासोबत असलेले खासगी आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याचा प्रकार रविवारी ओशिवरा परिसरात उघड झाला.

The actress's private photo was taken viral, the casting director arrested | अभिनेत्रीचे मित्रासोबतचे खासगी फोटो केले व्हायरल, कास्टिंग डायरेक्टरला अटक

अभिनेत्रीचे मित्रासोबतचे खासगी फोटो केले व्हायरल, कास्टिंग डायरेक्टरला अटक

googlenewsNext

मुंबई : पैशांच्या वादात एका अभिनेत्रीचे तिच्या मित्रासोबत असलेले खासगी आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याचा प्रकार रविवारी ओशिवरा परिसरात उघड झाला. या प्रकरणी पोलिसांनी एका कास्टिंग डायरेक्टरला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.
महावीर टाक उर्फ नकुल (२८) असे अटक करण्यात आलेल्या कास्टिंग डायरेक्टरचे नाव आहे. त्याने पीडित अभिनेत्रीच्या कास्टिंग डायरेक्टर मित्राला एका प्रोजेक्टसाठी काही महिन्यांपूर्वी तीन लाख रुपये दिले होते. एका प्रोजेक्टसाठी ते पैसे त्याला हवे असल्याचे टाक याला सांगून ते घेतले होते; मात्र काही कारणाने मित्राचे प्रोजेक्ट सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे तो टाक याचे पैसेही परत करत नव्हता. वारंवार टाकने त्याला विचारणा केली, मात्र तो टाळत होता.
पैसे न परत केल्याने टाकने त्याचा मोबाइल स्वत:कडे ठेवून घेतला. त्यानंतर अभिनेत्रीचे काही खासगी फोटो सोशल मीडियावर पाहिल्याचे तिच्या मित्राने तिला सांगितले. तिला धक्का बसला. त्यानंतर हे फोटो आपल्याच मोबाइलमधील असल्याचे मित्राला आठवले. यात टाक याचा हात असल्याचे उघड झाले आणि त्यांनी या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी छेडछाड आणि आयटी अ‍ॅक्टनुसार टाक याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
 

Web Title: The actress's private photo was taken viral, the casting director arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.