शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री झारा खानला धमकी देणारी अटकेत; ओशिवरा पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 07:03 IST

Actress Zara Khan : बॉलीवूडमधील अन्य काही सेलिब्रिटींनाही तिने अशाच प्रकारे धमकावल्याची माहिती असून, पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सलमा आगा यांची कन्या अभिनेत्री व गायिका झारा खान हिला धमकी देणाऱ्या महिलेला बुधवारी ओशिवरा पोलिसांनी अटक केली. नेहा सरवर (३९) असे धमकी देणाऱ्या महिलेचे नाव असून, ती खासगी मार्केटिंग कंपनीत काम करते. बॉलीवूडमधील अन्य काही सेलिब्रिटींनाही तिने अशाच प्रकारे धमकावल्याची माहिती असून, पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.सोशल मीडियावरून शिवीगाळ करीत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याची तक्रार झाराने ओशिवरा पोलिसांत दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तांत्रिक तपासाअंती हैदराबाद येथे राहणाऱ्या नेहाची माहिती मिळविली. तिला १९ डिसेंबर, २०२० रोजी पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावली. मात्र ती हजर न झाल्याने तिला पुन्हा नोटीस बजावली. बुधवारी ती ओशिवरा पोलीस ठाण्यात आल्यावर  चाैकशीअंती तिला अटक झाली.झारा खानसह तिने साहिल पीरजादे, कुशल टंडन, कमाल खान आणि एजाज खान यांनाही अशाच प्रकारे धमकावल्याचे तपासात उघड झाले आहे. ‘आरोपी महिलेने अशा प्रकारे बनावट आयडी बनवत आणखी काही लोकांना धमकावले आहे का?’ याबाबत चौकशी सुरू आहे,’ असे बांगर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

‘मेसेंजर ऑफ गॉड’साठी हाेता विरोधनेहा सोशल मीडियावर पुरुषांच्या नावे बनावट आयडी बनवून धमकी देत हाेती. झारा स्वतःला ‘मेसेंजर ऑफ गॉड’ (देवाचा संदेश देणारी) समजते, ज्याला नेहाचा विरोध होता म्हणून ती असे वागल्याचे पाेलिसांनी ­सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक