बंगळुरू : कन्नड चित्रपट उद्योगातील अमलीपदार्थाच्या कारभाराबाबत चौकशी करणाऱ्या बंगळुरूच्या मध्यवर्ती गुन्हा शाखेने (सीसीबी) अभिनेत्री रागिणी द्विवेदी आणि दोन व्यक्तींना अटक केली आहे.रागिणी द्विवेदीसोबत, राहुल आणि विरेन खन्ना यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. गुरुवारी के. रविशंकर याला अटक केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे, असे बंगळुरूचे पोलीस सहआयुक्त संदीप पाटील यांनी सांगितले.शुक्रवारी सकाळी गुन्हे शाखेने रागिणी द्विवेदीच्या घरावर धाड घातली होती. दुपारी मध्यवर्ती गुन्हा शाखेच्या कार्यालयात नेऊन अमलीपदार्थप्रकरणी तिची चौकशी करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी अटक करून तिला ताब्यात घेण्यात आले, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. रवी आणि राहुल दोघेही नेहमी पार्ट्यांना जात आणि विदेशी नागरिकांकडून ड्रग मिळवीत.विरेन खन्ना आयोजकअमलीपदार्थांच्या सेवनासाठी मोठमोठ्या पार्ट्यांचा मुख्य आयोजक विरेन खन्ना आहे. तो दिल्लीत होता. त्याला अटक करण्यासाठी सीसीबीचे दोन पोलीस निरीक्षक दिल्लीला गेले होते.रविशंकरला के.के. शंकर या नावेही ओळखले जाते. तो मार्ग परिवहन कार्यालयात कारकून आहे. त्याला गुरुवारी अटक करण्यात आली. राहुल याला शुक्रवारी ताब्यात घेतले, असे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी सांगितले.
ड्रग रॅकेटप्रकरणी अभिनेत्री रागिणी द्विवेदीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 06:12 IST