शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री पल्लवी जोशीला सायबर चोरट्यांनी घातला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 15:53 IST

पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

ठळक मुद्देअंधेरी सात बंगला परिसरात पल्लवी जोशी या राहतात. त्यांच्या खात्यातून युरो चलनाद्वारे पैसे काढण्यात आल्याचे ते मेसेज होते. त्यामुळे या प्रकरणात आंतरराष्ट्रीय सायबर चोरांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे.

मुंबई - प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशीला सायबर चोरट्यांनी टार्गेट केले आहे . तिच्या क्रेडिट कार्डचा डाटा चोरून आरोपींनी युरोपात त्या पैशांचा वापर केला असल्याचे तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

अंधेरी सात बंगला परिसरात पल्लवी जोशी या राहतात. ५ जून रोजी पल्लवी या त्यांच्या कार्यालयात काम करत बसल्या असताना त्यांच्या मोबाइलवर एकसारखे मेसेज येऊ लागल्यामुळे त्यांनी मोबाइल पाहिला. तेव्हा मोबाइलवर पाच - सहा मेसेज आले होते. त्यांच्या खात्यातून युरो चलनाद्वारे पैसे काढण्यात आल्याचे ते मेसेज होते. खात्यातून अजून पैसे जाण्याआधीच पल्लवी यांनी बँकेत फोन करून खाते बंद केले. मात्र तोपर्यंत जोशी यांच्या खात्यातून १२ हजार रुपये काढण्यात आले होते. त्यानंतर ६ जून रोजी वर्सोवा पोलीस ठाण्यात पल्लवी यांनी तक्रार दाखल केली. बँकेत केलेल्या चौकशीत हे पैसे युरोपमधील टॅक्सी खर्च आणि खरेदीसाठी वापरल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या प्रकरणात आंतरराष्ट्रीय सायबर चोरांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी पोलिसांनी बँकेकडे या व्यवहाराबाबत माहिती मागवली असून त्या माहितीच्या आधारे पोलीस पुढील तपास करणार आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसPallavi Joshiपल्लवी जोशीbankबँक