शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेते धर्मेश व्यास यांना लाखोंचा गंडा; पण गोल्डन अवरमध्ये तक्रार, पैसे परत मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 08:23 IST

अंधेरीच्या न्यू म्हाडा लोखंडवाला परिसरात व्यास राहतात. त्यांना ७ डिसेंबर रोजी त्यांना अज्ञात नंबरवरून कॉल आला होता, ९ डिसेंबरला पैसे कापले गेले.

 लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पासपोर्ट डिस्पॅच आला आहे. मात्र, तो ब्लॉक असून, अनब्लॉक करण्यासाठी पाच रुपये पाठवावे लागतील, असे सांगत अभिनेते धर्मेश व्यास यांना १ लाखाचा गंडा घालण्यात आला. मात्र, त्यांनी या प्रकरणी वेळीच ओशिवरा पोलिसात धाव घेतल्याने त्यांचे पैसे त्यांना परत मिळणार आहेत.

अंधेरीच्या न्यू म्हाडा लोखंडवाला परिसरात व्यास राहतात. त्यांना ७ डिसेंबर रोजी त्यांना अज्ञात नंबरवरून कॉल आला. या कॉलरने तुमचा पासपोर्ट आला असून, डिस्पॅच करण्याचा कोड ब्लॉक झाला आहे, तो अनब्लॉक करण्यासाठी पाच रुपये पाठवावे लागतील, असे त्यांना सांगितले. धर्मेश व्यास शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांनी कोणताही विचार न करता समोरील नंबरवर पाच रुपये पाठविले. त्यानंतर, ९ डिसेंबर रोजी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातून एकूण ९९ हजार ९९९ रुपये वजा झाल्याचा मेसेज त्यांना प्राप्त झाला. तेव्हा त्यांनी तत्काळ त्यांच्या बँकेची संपर्क केल्यावर त्यांच्याबरोबर ऑनलाइन फ्रॉड झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तेव्हा तक्रार यांनी  ओशिवरा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. 

ओशिवरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर धनावडे व निरीक्षक सकुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर अधिकारी पोलिस उपनिरीक्षक दिगंबर कुरकुटे, हवालदार अशोक कोंडे, कॉन्स्टेबल विक्रम सरनोबत यांनी तत्काळ प्राप्त माहितीच्या आधार फिर्यादी यांच्या एचडीएफसी बँकेच्या मॅनेजरशी संपर्क करून झालेल्या व्यवहाराची माहिती प्राप्त केली. तेव्हा व्यास यांचे पैसे आयडीएफसीमध्ये वळते झाल्याने त्या बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क करून तत्काळ फिर्यादी यांची फसवणूक झालेली सर्व रक्कम गोठविण्यात यश प्राप्त झाले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी