शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Ajaz khan : NCB च्या कोठडीत असलेला अभिनेता पॉझिटीव्ह, तपास अधिकारी क्वारंटाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 10:57 IST

Ajaz khan : एनसीबीकडून गेल्या दोन दिवसांपासून एजाज खानची चौकीशी सुरू आहे. या चौकशीत एजाजने आणखी दोन टिव्ही कलाकारांची नावं घेतली असल्याचे म्हटले जात आहे.

ठळक मुद्देचौकशीदरम्यान एजाज खान कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला आहे. त्यामुळे, तपास अधिकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

मुंबई - बॉलिवूड अभिनेता एजाज खानचा ड्रग्ज तस्कराशी संबंध असल्याच्या आरोपावरून अमली पदार्थविरोधी नियंत्रण कक्षाने (एनसीबी) त्याला नुकतीच अटक केली आहे. ड्रग्ज माफिया फारूख बटाटा आणि त्याचा मुलगा शादाब बटाटा याच्याशी अमली पदार्थ विक्री आणि सेवन व्यवहारात त्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या सगळ्यांची सध्या एनसीबीकडून कसून चौकशी सुरू आहे. मात्र, चौकशीदरम्यान एजाज खान कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला आहे. त्यामुळे, तपास अधिकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

एनसीबीकडून गेल्या दोन दिवसांपासून एजाज खानची चौकीशी सुरू आहे. या चौकशीत एजाजने आणखी दोन टिव्ही कलाकारांची नावं घेतली असल्याचे म्हटले जात आहे. हे दोन्ही कलाकार अंधेरीतील लोखंडवाला परिसरात राहातात. एजाजने या कलाकारांची नावं घेतल्यानंतर त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. पण त्याआधीच हे कलाकार फरार झाले आहेत. मात्र,  त्यांच्या घरात ड्रग्स सापडले असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, चौकशीत असतानाच एजाज खानची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये, अजाज खानचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे, एनसीबीच्या कस्टडीतून रुग्णालयात त्याची रवानगी करण्यात आली आहे. तर, एजाजची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना कोरोना चाचणी करण्यासाठी पाठविण्यात आले असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.  

बिग बॉसमध्ये झळकला होता एजाज खानएजाज खानने एक अभिनेता आणि एका अभिनेत्रीचे नाव घेतले असून या दोघांकडेही भारताचे नागरिकत्व नाहीये. हे दोघेही विदेशी नागरिक असून त्यांचा सध्या पोलिस त्यांचा शोध घेत आहे. तसेच त्यांच्या संपर्कात असलेल्या कलाकारांची देखील चौकशी केली जात आहे. एजाज खान बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये झळकला होता. त्याने काही चित्रपट आणि मालिकांमध्ये देखील काम केले आहे. ड्रग्स बाळगल्याप्रकरणी 2018 मध्ये देखील एजाजला अटक करण्यात आली होती.  

टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोcorona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईbollywoodबॉलिवूड