शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता ब्रम्हा मिश्रा अर्धवट कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 17:01 IST

Actor Brahma Mishra Died :अभिनेता ब्रम्हा मिश्रा याचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. त्यांचा अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह राहत्या घरातून ताब्यात घेत वर्सोवा पोलिसांनी शवविच्छेदनासाठी कुपर रुग्णालयात पाठविला आहे.

मुंबई - मिर्झापुर या वेबसीरिजमध्ये काम करणारा अभिनेता ब्रम्हा मिश्रा याचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. त्यांचा अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह राहत्या घरातून ताब्यात घेत वर्सोवा पोलिसांनी शवविच्छेदनासाठी कुपर रुग्णालयात पाठविला आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

यारी रोडवरील एका इमारतीत ब्रम्हा मिश्रा भाड्याने राहत होता. मिर्झापूर या वेबसीरिजमध्ये मुन्ना भैय्याचा खास मित्र ललितची भूमिका साकारणाऱ्या  ब्रम्हा मिश्रा यांचे निधन झाले आहे. २९ नोव्हेंबर रोजी छातीत दुखू लागल्याने डॉक्टरांनी त्यांना ऍसिडीटीचे औषध देऊन घरी पाठवले. मात्र घरीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले अशी चर्चा आहे. वेदनादायक बाब म्हणजे त्यांचा मृतदेह तीन दिवस मुंबईच्या यारी रोड वर्सोवा येथील घराच्या बाथरूममध्ये पडून होता. सध्या वर्सोवा पोलीस घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून मृत्यूची नेमकी वेळ आणि कारण हे त्याचा अहवाल आल्यानंतर कळू शकेल, अशी माहिती दैनिक भास्करने दिली आहे. तसेच अधिक तपास सुरू असल्याचे वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिराज इनामदार यांनीसांगितले.

ब्रह्मा हा अभिनेता भोपाळचा रहिवासी होताभोपाळ रायसेनचे रहिवासी असलेला ब्रम्हा मिश्रा हा ३२ वर्षांचा होता. रायसेनमध्येच त्याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्याचे वडील जमीन विकास बँकेत कामाला होते. मिर्झापूरशिवाय ब्रह्माने केसरी, हसीन दिलरुबा, मांझी, बद्रीनाथ की दुल्हनिया या चित्रपटांमध्येही काम केले होते.शेवटचा चित्रपट या वर्षी आला होताब्रह्माने २०१३ मध्ये चोर चोर सुपर चोर या चित्रपटातून पदार्पण केले होते. २०२१ मध्ये तापसी पन्नू विरुद्धचा 'हसीन दिलरुबा' हा त्याचा शेवटचा चित्रपट होता. मुंबईत सुरु असलेल्या करियरच्या संघर्षादरम्यान त्याला कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागला नाही कारण त्यांचे वडील आणि मोठा भाऊ संदीप यांनी त्याला साथ दिली होती.

टॅग्स :Deathमृत्यूMirzapur WebSeriesमिर्झापूर वेबसीरिजPoliceपोलिस