शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गुजरातच्या रेती चोरी करणाऱ्या 11 ट्रकवर कासा पोलिसांची केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 21:42 IST

कासा - डहाणू तालुक्यातील कासा पोलिसांनी गुजरातच्या 11 ट्रकवर कारवाई करुन रेती माफिया अटक केली आहेत. या 11 कंटेनरमधून 62 ब्रास रेती जप्त केली असून तब्बल 2 कोटी 26 लाख 20 हजाराचा रेती व ट्रक सहित मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या मध्ये 6 लाख 20 हजार किंमतीची केवळ रेती ...

कासा - डहाणू तालुक्यातील कासा पोलिसांनी गुजरातच्या 11 ट्रकवर कारवाई करुन रेती माफिया अटक केली आहेत. या 11 कंटेनरमधून 62 ब्रास रेती जप्त केली असून तब्बल 2 कोटी 26 लाख 20 हजाराचा रेती व ट्रक सहित मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या मध्ये 6 लाख 20 हजार किंमतीची केवळ रेती आहे.

या मध्ये आरोपी संदीप महेंद्र र‍ाॅय (वडोली), रोशन राकवास यादव (वडोली), सतेेंद्रचरास रामरास यादव (पालेज), राजेंद्र दयाराम वर्मा ( वलसाना ), शितलाप्रसाद हरभजन धुरिया( अंकलेश्वर), राजेश रामकरण यादव(वलसाना)बगवंत बिरकुट  गुप्ता(वलसाना), मोहमद नाफीज रईस खान(चिखली), फरीयाद मनाजू दवान(वडोदरा), जगदिश रामकरण शाहु(वियोदरा), जोहर सिरियाजुद्दीन अढी(अंकलेश्वर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांना गुजरातहून मुंबईकडे चोरट्या पद्धतीने रेतीची वाहतूक करणारे कंटेनर निघाले असल्याची गुप्त बातमी हाती लागताच रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास चारोटी टोलनाका येथे पोलिश अधिक्षक गौरव सिंग व अप्पर पोलिस अधीक्षक योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कासा पोलीस ठाण्याचे सहाय्य पोलीस निरीक्षक  प्रकाश सोनावणे  यांच्या नेतृत्वाखाली साफळा रचून  रेतीचे कंटेनर पोलीसांनी अडवले असता .त्यांना  गाडीत  रेडिमेक्सची असल्याची बिल्टी दाखवली गेली .मात्र पोलिसांनी  कंटेनरमध्ये साहित्य तपासले असता त्यामध्ये रेडिमेक्सच्या नावाखाली गाैणखनिज (रेती)  पिशव्या मध्ये भरलेले असल्याचे आढळले.त्यानंतर कासा पोलीसांनी ट्रक जप्त करुन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींना डहाणू कोर्टात हजर केले असता 21 तारखेपर्यन्त सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान यामुळे गुजरातहून मुंबईकडे चोरटी रेती वाहतूक उघड झाली आहे.सदर आरोपी हे गुजरात राज्यातील भरूच,बलसाड, बलसाना  येथून रेती भरून मुंबईकडे विक्री साठी नेत होते. व कोणालाही संशय येवू नये यासाठी आरोपी रेती पिशवीत भरून कंटेनरमध्ये भरायचे पुढील तपास कासा पोलिस करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी