शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

दोन बारवर कारवाई; ४२ जणांवर गुन्हा दाखल, पनवेलमध्ये पोलिसांकडून धाडसत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 11:31 IST

याप्रकरणी पोलिसांनी आठ महिला, तीन पुरुष वेटर, विजय बोगरा नाईक (मॅनेजर), गोपाळ जानू म्हात्रे, विश्वनाथ शेखर देवाडिगा व एक अनोळखी इसम अशा एकूण १५ जणांवर गुन्हा दाखल केला.

नवीन पनवेल : पनवेल तालुका पोलिसांनी कोन येथील गोल्डन नाइट बार आणि हॉटेल नाइट रायडर बार अँड ऑर्केस्ट्रा या दोन बारवर कारवाई करून तब्बल ४२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखा कक्ष एकने कोन येथील क्रेझी बॉईज बार अँड रेस्टॉरंटवर कारवाई करून २६ ते २७ जणांवर गुन्हा दाखल केला होता.    

कोनगाव येथील गोल्डन नाइट बार या ठिकाणी लेडीज वेटर अश्लील हावभाव करून ग्राहकांशी शारीरिक लगट करत असल्याची माहिती पनवेल तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी साध्या वेशात गोल्डन नाइट बारमध्ये प्रवेश केला. यावेळी अश्लील हावभाव, कृत्य सुरू असल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलिसांनी आठ महिला, तीन पुरुष वेटर, विजय बोगरा नाईक (मॅनेजर), गोपाळ जानू म्हात्रे, विश्वनाथ शेखर देवाडिगा व एक अनोळखी इसम अशा एकूण १५ जणांवर गुन्हा दाखल केला.

तर कोन येथील हॉटेल नाइट रायडर बार अँड ऑर्केस्ट्रामध्ये ग्राहकांच्या मनोरंजनासाठी हॉटेलमधील महिला सिंगर या अंगप्रदर्शन तसेच अश्लील हावभाव करून ग्राहकांना आकर्षित करत असल्याची माहिती पनवेल तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली असून १८ महिला सिंगर, सुधाकर कृष्णा शेट्टी (मॅनेजर), हरीश बेगू शेट्टी (मॅनेजर), तीन वेटर, चार ग्राहक अशा एकूण २७ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. 

कारवाई होऊनही परिस्थिती जैसे थे    पनवेलमधील बारवर वेळोवेळी कारवाई होऊनदेखील सर्रासपणे नियमांचे उल्लंघन केले जात आहे. महिला अश्लील हावभाव, नृत्य करून ग्राहकांना आकर्षित करतात.     दोन वर्षांपूर्वी एका बारमध्ये सिंगर म्हणून काम करणाऱ्या तरुणीवर बलात्कार करण्यात आला होता.     येथील बारवर कारवाई होऊनदेखील गैरधंद्यांना ऊत आल्यामुळे या बारचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी मनसे महिला जिल्हाध्यक्ष आदिती सोनार यांनी केली आहे. 

ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबारलेडीज सर्व्हिस व ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सर्रासपणे डान्सबार सुरू असल्याचे समोर आले आहे. येथील बहुतांशी बार हे शेट्टी (अण्णा) यांना भाड्याने चालविण्यासाठी दिलेले आहेत. बारमध्ये कायदा धाब्यावर बसवून गैरमार्गाने पैसा कमावला जात आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तांनी पुन्हा एकदा या गैरकृत्यांकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी