Action of DRI; Four persons arrested for smuggling 300 foreign birds | डीआरआयची कारवाई; ३०० परदेशी पक्षांची तस्करी केल्याप्रकरणी चौघांना अटक 
डीआरआयची कारवाई; ३०० परदेशी पक्षांची तस्करी केल्याप्रकरणी चौघांना अटक 

ठळक मुद्दे ३०० हून अधिक परदेशी पक्षांची सुटका केली आहे. डीआरआयच्या विविध पथकांनी एकाच वेळी या सर्व ठिकाणांवर छापेमारी केली  या प्रकरणी डीआरआयने चौघांना जेरबंद केले आहे.

मुंबई - मुंबईसह विविध ठिकाणांहून परदेशी पक्षांची विक्री करणाऱ्या ठिकाणी डीआरआयने कारवाई केली असून ३०० हून अधिक परदेशी पक्षांची सुटका केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांनी हे पक्षी बेकायदेशीररित्या पाळल्याचं उघडकीस आलं आहे. 

ओपेरा हाऊस, क्रॉफर्ड मार्केट, चेंबूर, कुर्ला, चेंबूर, कर्जत, गोवंडी, बैंगणवाडी आदी ठिकाणी परदेशी पक्षी बंदिस्त ठेवण्यात आले असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार डीआरआयच्या विविध पथकांनी एकाच वेळी या सर्व ठिकाणांवर छापेमारी केली असता त्यांना ३०० हून अधिक परदेशी पक्षी सापडले. या पक्षांंना बाजारात मोठी मागणी असल्यानं त्याची तस्करी केली जाते. डीआरआयला मिळालेल्या पक्षांमध्ये कोकाटूस, अफ्रिकन पोपट, लव्ह बर्ड, फ्लेमिंगो या पक्षांचा समावेश आहे. या प्रकरणी डीआरआयने चौघांना जेरबंद केले आहे. आतापर्यंतची ही डाआरआयची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जातं आहे. या प्रकरणात अन्य आरोपींचाही सहभाग असल्याचा संशय डीआरआयच्या पोलिसांना असून त्या अनुषंगाने ते तपास सुरु आहे. 


Web Title: Action of DRI; Four persons arrested for smuggling 300 foreign birds
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.