शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

कल्याण डोंबिवलीत ६७ तळीराम वाहनचालकांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 17:29 IST

Crime News : वाहन चालवण्यास प्रवृत्त करणाऱ्या २१ जणांवर कारवाई

ठळक मुद्देकल्याण शहर हद्दीमध्ये मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या एकूण २४ वाहन चालकांवर तसेच दारू पिऊन गाडी चालविण्यास प्रवृत्त करणाऱ्या एकूण ७ जणांवर कारवाई करण्यात आली.

डोंबिवली - ३१ डिसेंबरच्या निमित्ताने मद्य प्राशनकरून वाहन चालवणाऱ्या ६७ वाहन चालकांवर कल्याणडोंबिवली शहरात वाहतूक पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत ६ कारवाई केली. त्यामध्ये कल्याणच्या ३१, डोंबिवलीच्या ३६ वाहनचालकांचा समावेश असून दुचाकी, चारचाकी वाहनचालक आणि त्याना वाहन चालवण्यास प्रवृत्त करणार्यां २१ जणांचा समावेश आहे.कल्याण शहर हद्दीमध्ये मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या एकूण २४ वाहन चालकांवर तसेच दारू पिऊन गाडी चालविण्यास प्रवृत्त करणाऱ्या एकूण ७ जणांवर कारवाई करण्यात आली. अश्याप्रकारे एकूण ३० दुचाकी , एक चारचाकी कारवाई करून ताब्यात घेण्यात आल्या आहेत. येथील दुर्गाडी किल्ला नजीकचा चौक, महात्मा फुले चौक, सुभाष चौक रेल्वे स्टेशन परिसर या ठिकाणी नाकाबंदी करून तपासणी सुरू होती. वाहतूक कल्याण उपविभाग प्रभारी पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील, दोन अधिकारी, ८ पोलीस हवालदार, १० पोलीस नाईक, ४ पोलीस शिपाई आणि ८ वॉर्डन यांनी सदरची कामगिरी केली.

त्याच कालावधीत डोंबिवली वाहतूक उपविभागाकडून डोंबिवली शहर हद्दीमध्ये मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या एकूण ३६ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. दारू पिऊन गाडी चालविण्यास प्रवृत्त करणाऱ्या एकूण १४ जणांवर कारवाई करण्यात आली. अशा एकूण ४४ दुचाकी , ०२ चारचाकी आणि ०४ रिक्षांवर कारवाई करून ताब्यात घेण्यात आल्या आहेत. डोंबिवली हद्दीतील रामनगर, शेलार नाका, शिवाजी नगर उद्यायोग चौकी, बावनचाळ, महात्मा फुले चौक, रेल्वे स्टेशन परिसर येथे करण्यात आली. डोंबिवली वाहतूक उप विभाग प्रभारी राजश्री शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक व ५ अधिकारी, १० पोलीस हवालदार, ७ पोलीस नाईक, ६ पोलीस शिपाई आणि ९वॉर्डन यांनी सदरची कामगिरी केल्याचे शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :Drunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस